Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मिडिया क्रिएटरने संपवलं आयुष्य, ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

सोशल मिडियावर रील्सच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका लोकप्रिय विवाहितेच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवेढ्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 12:12 PM
रील्सस्टार रोहिणी पाराध्येने संपवलं आयुष्य, 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

रील्सस्टार रोहिणी पाराध्येने संपवलं आयुष्य, 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

Follow Us
Follow Us:
  • सोशल मिडियावर लोकप्रियता मिळवलेल्या तरुणीच्या अचानक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
  • कुटुंबासह व्यवसाय आणि ऑनलाईन जगात यशस्वी वाटचाल सुरू असतानाच घडलेल्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
  • आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या रील्सस्टार महिलेने रिअल लाईफमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली आहे. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) असे मृत रील्सस्टार विवाहितेचे नाव असून, मंगळवारी दुपारी स्वतःच्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. रोहिणी पाराध्ये या पती निलेश पाराध्ये यांच्यासह ब्रम्हपुरी येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत त्यांच्या मालकीचे “हॉटेल ग्रामपंचायत” हे हॉटेल चालवत होत्या. याच हॉटेलच्या किचनमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

Raigad Crime: उन्हाळी सुट्टीसाठी गावी आली अन् थेट जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली…

सोशल मीडियावरून मिळवली होती वेगळी ओळख

रोहिणी आणि निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर विनोदी, सामाजिक तसेच खाद्यसंस्कृतीवरील रील्समुळे चांगलेच लोकप्रिय झाले होते, त्यांच्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता, त्यातूनच त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यवसाय आणि सोशल मीडियावर यशस्वी वाटचाल सुरू असतानाच अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Nagpur Crime: भीषण प्रकार! जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण

कारण समोर आलं नाही

ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची मंगळवेढा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. रोहिणी यानी रील्सच्या माध्यमातून अल्पावधीतच प्रसिद्धीचे टोक गाठले होते, सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत. त्यांचे कौटुंबिक आयुष्य सुद्धा उत्तम चालले होते. असे असताना त्यानी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? यासंदर्भातच तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Social media reels star rohini paradhye commits suicide at hotel in mangalwedha solapur news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Suicide case

संबंधित बातम्या

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
1

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
2

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
3

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
4

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.