Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: त्याने वापर करून सोडलं’…, मेसेजनंतर आयटी तरुणीची मुठा नदीत उडी मारून आत्महत्या

पुण्यात एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने फसवणूक केल्याचा आरोप तिने मृत्यूपूर्वी भावाला मेसेजद्वारे केला होता. पोलिसांनी तक्रारीनुसार तपास सुरू केला असून प्रियकराची चौकशी होण्याची शक्यता आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 02:39 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आत्महत्या केली.
  • प्रियकराने फसवणूक केल्याचा आरोप मृत्यूपूर्वी तिने केला होता.
  • पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून प्रियकराची चौकशी होणार.
पुणे: पुणे शहरातून आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीने मृत्यूपूर्वी आपल्या भावाला मेसेज केला होता. या मेसेजमध्ये केलेल्या आरोपांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. तरुणीने तीन महिन्यापूर्वी आपल्या कुटुंबियांना या नात्याबद्दल कल्पना दिली होती. दोघेही लग्न करणार होते. तिची आई देखील या नात्यासाठी सकारात्मक होती आणि तिने नातेवाईकांना लग्नाबद्दल माहिती दिली होती. तिने आपल्या भावाला मेसेज करत प्रियकराने आपली फसवणूक केल्याचे आणि वापर करून घेतल्याचे सांगितले. प्रियकराने तिला विसरून जाण्यास सांगितले. यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. तिला तिच्या भावाने समजावले मात्र ती काहीच ऐकण्याच्या तयारीत नव्हती. तरुणी आपल्या निर्णयावर ठाम होती.

यानंतर तरुणीने मुठा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. यानंतर पोलिसांना तिचा जेव्हा मृतदेह नदीपात्रात सापडला तेव्हा खराडी पोलिसांचा तरुणीच्या भावाला फोन केला. तरुणीच्या भावाने या प्रकरणी तरुणीच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

नसरापूर प्रकरणाला वेग! 15 दिवसांत चार्जशीट, 28 दिवसांत भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित

 नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून आरोपी भीमराव कांबळे विरोधात अवघ्या 28 दिवसांत न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणात आरोपीविरोधात प्रथमदर्शनी (prima facie) पुरावे उपलब्ध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

या प्रकरणातील खटल्याची सुनावणी रोज होणार असून ती ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. म्हणजेच, सुनावणी बंद दाराआड होईल आणि केवळ संबंधित पक्षांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याला यावेळी पहिल्यांदाच प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांकडून आरोप निश्चितीला विरोध करण्यात आला. आरोपीविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला होता. मात्र, तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रे, पुरावे आणि चार्जशीटचा विचार करून न्यायालयाने आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला.

Pune Nasrapur Case : नसरापूर प्रकरणाला वेग! 15 दिवसांत चार्जशीट, 28 दिवसांत भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणीने आत्महत्येपूर्वी काय सांगितले होते?

    Ans: तिने भावाला मेसेज करून प्रियकराने आपली फसवणूक केल्याचे आणि वापर करून सोडल्याचे सांगितले होते.

  • Que: तरुणीचे कोणासोबत प्रेमसंबंध होते?

    Ans: तिचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते आणि दोघांचे लग्न होणार असल्याची माहिती कुटुंबाला होती.

  • Que: पोलिस आता काय तपास करत आहेत?

    Ans: पोलिस आत्महत्येमागील कारणांचा तपास करत असून संशयित प्रियकराची चौकशी करण्याची शक्यता आहे.

Web Title: Pune crime he used me and cast me aside it professional commits suicide by jumping into mutha river following a message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
2

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
3

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
4

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.