(फोटो सौजन्य: Pinterest)
‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत घोणे, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे यांच्या पथकाने या कारवाईचे नेतृत्व केले.
यूट्यूबवर पहायचे उपचाराचे व्हिडीओ
तपासात उघड झालेली धक्कादायक बाब म्हणजे, अटकेतील बहुतांश आरोपी हे केवळ आठवी ते दहावीपर्यंतच शिक्षण घेतलेले आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र नसताना हे बोगस डॉक्टर गूगल, युट्यूब आणि ‘चॅट जीपीटी’ सारख्या एआय टूल्सवर आजारांची लक्षणे शोधून रुग्णांवर उपचार करत होते तसेच त्यांना हाय-डोस अँटिबायोटिक्स (औषधे) देत होते.
Crime News : तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील
छाप्यादरम्यान पोलिसांनी १,१९,३२४ रुपये मूल्याची अॅलोपॅथी औषधे, इंजेक्शन, सिरिंज आणि वैद्यकीय साधने जप्त केली आहेत. या प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात ४ आणि निर्मल नगर पोलीस ठाण्यात १ अशा एकूण ५ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. गोवंडी, शिवाजी नगर, बैगणवाडी आणि मानखुर्द या भागांत अवैध नर्सिंग होम आणि शेकडो बोगस क्लिनिक्सचे जाळे पसरले आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बोगस डॉक्टर अनेकदा पकडले जाऊनही जामिनावर सुटताच पुन्हा आपली ‘दुकानदारी’ थाटतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कारभारामुळे या आरोपींचे धाडस वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

