Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोर्शे अपघात प्रकरणात सरकारी वकिलांची मोठी माहिती; अजय तावरेनेच ‘तो’ कट रचल्याचे पुरावे…

रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉ. अजय तावरेचा सक्रिय सहभाग सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आहेत, अशी माहिती सरकार पक्षातर्फे गुरुवारी विशेष न्यायालयात देण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2025 | 12:50 PM
पोर्शे अपघात प्रकरणात सरकारी वकिलांची मोठी माहिती; अजय तावरेनेच 'तो' कट रचल्याचे दिले पुरावे

पोर्शे अपघात प्रकरणात सरकारी वकिलांची मोठी माहिती; अजय तावरेनेच 'तो' कट रचल्याचे दिले पुरावे

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर अल्पवयीन कारचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व वॉर्डबॉय अतुल घटकांबळेच्या संपर्कात होता. त्यामुळे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉ. अजय तावरेचा सक्रिय सहभाग सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आहेत, अशी माहिती सरकार पक्षातर्फे गुरुवारी विशेष न्यायालयात देण्यात आली.

कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी (दि. १८ मे २०२४) मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‘पोर्शे’ कार भरधाव चालवून दुचाकीला उडविले होते. या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या अल्पवयीन मुलाने व त्याच्या मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यात मद्यपान केले होते. त्यामुळे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेले होते. तिथे या मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल व शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायदा व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणात सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयात आरोपी अजय तावरे याने निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला आहे. त्याला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध केला. घटनेच्या दिवशी रजेवर असल्याचा दावा तावरे याने केला आहे. परंतु, त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता, तो डॉ. हाळनोर व अतुल घटकांबळेच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे. पालकांच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्याने दबाव टाकला. साक्षीदारांनी कबुलीजबाब नोंदविला असून, त्याद्वारे तावरे याची या कटात महत्त्वाची भूमिका निदर्शनास येते, असा युक्तिवाद हिरे यांनी केला. या अर्जावर १० जून पुढील सुनावणी रोजी होणार असून, तावरे याचे वकील युक्तिवाद करणार आहेत.

हे सुद्धा वाचा : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Web Title: Government prosecutors have presented evidence to the court in the porsche accident case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
2

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.