Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujarat Crime: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या

गुजरातच्या राजकोटमध्ये सोशल मीडियावरील प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट झाला. फेसबुक व इन्स्टाग्रामवर तरुणी असल्याचा बनाव करून एका व्यक्तीने तरुणाशी संबंध प्रस्थापित केले. नंतर ती व्यक्ती प्रत्यक्षात पुरुष असल्याचे समोर आल्यानंतर दोघांत वाद झाले. संतापाच्या भरात आरोपीने दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आर

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2026 | 12:26 PM
प्रेयसीच्या वडिलांची हत्या

प्रेयसीच्या वडिलांची हत्या

Follow Us
Follow Us:
  • फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून आरोपीशी ओळख वाढवण्यात आली.
  • संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पुरुष असल्याचे समोर आल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढले आणि हत्या झाली.
  • सीसीटीव्ही, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि सोशल मीडिया चॅट्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
गुजरात: गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तरुणी असल्याचा बनाव, तीन वर्ष पत्नी म्हणून राहणाऱ्या एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. तरुणाने मुलगी समजून लग्न केलं तोच व्यक्ती पत्नी नसून पुरुष असल्याचे समोर येताच दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घडलेला प्रकार गुजरातच्या राजकोटमध्ये २५ जून रोजी घडला आहे.

कसा उघडकीस आला प्रकरण?

हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव पियुष कुमार खरवार असे आहे. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. राजकोटमधील मस्कट फाटक येथील रेल्वेच्या भिंतीजवळ एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे पोलिसांनी अंदाज वर्तवला. मात्र पोस्टमार्टम अहवालात संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि दगडाने मारहाण केल्याचे समोर आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.

फेसबुकवर ओळख आणि…

आरोपी पियुष कुमार हैदराबाद येथे कमला होता तेव्हा तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची चंदन कुमार याच्याशी ओळख झाली होती. चंदन कुमारने स्वतःचे नाव फेसबुकवर निशा कुमार तर इंस्टाग्रामवर पूनम असे ठेवून मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केली होती. चंदनने पियुषचा विश्वास संपादन केला. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहू लागले. पियुषने तिला आपली पत्नी मानून तिच्याशी विवाह केला होता. मात्र, शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ आल्यावर चंदन धार्मिक व्रताचे आणि उपवासाचे कारण देऊन नेहमी टाळाटाळ करत असे. पियुषनेही त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला होता.

Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

सत्य आले समोर

काही दिवसांनंतर, पियुषने चंदनला घरात दाढी करताना रंगेहाथ पाहिले. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या पूनमला तो आपली पत्नी समजत होता तो पत्नी नसून प्रत्यक्षात पुरुष होता. दोघांमध्ये प्रचंड वाद होऊ लागले. या वादाला कंटाळून पियुषने हैद्राबाद सोडले आणि तो उत्तर प्रदेश, राजस्थान करत शेवटी गुजरातच्या राजकोटमधील पडवाला गावातील एका कारखान्यात कामाला लागला. मात्र, चंदनने त्याचा पिच्छा सोडला नाही आणि तो प्रत्येक ठिकाणी पियुषच्या मागे गेला. चंदन २१ जून रोजी पडवाला येथील कारखान्यात गेला. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

रात्री संतापलेल्या पियुषने चंदनला रेल्वे ट्रॅकजवळील एका निर्जन स्थळी नेले. तिथे त्याने दगडाने चंदनच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्याने छंदांचा मृतदेह महिलांच्या कपड्यांमध्ये गुंडाळून मोठ्या दगडांखाली लपवून ठेवला आणि तो पुन्हा कामावर परतला.

महिला बनून अनेक तरुणांच्या संपर्कात

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडिया चॅट्सच्या आधारे पोलिसांनी पियुष कुमार याला ताब्यात घेतले. त्याची कठोर चौकशी केल्यांनतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. मृत चंदन कुमार गेल्या तीन वर्षांपासून महिला बनून अनेक तरुणांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली असून पोलीस त्याच्या इतर सोशल मीडिया अकाऊंटचीही चौकशी करत आहेत.

धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: गुजरातमधील राजकोट येथे ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय होते?

    Ans: सोशल मीडियावर महिलेची बनावट ओळख वापरून फसवणूक झाल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेला वाद हे प्राथमिक कारण असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपीपर्यंत कसा पोहोचला?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि सोशल मीडिया चॅट्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

Web Title: Gujarat crime believed spouse was a woman for three years murdered by bludgeoning with a stone upon discovering the partner was actually a man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.