धक्कादायक! ५ वर्षीय चिमुकलीचा नरबळी, नंतर कापलेल्या मुंडक्यामधून पडणारं रक्त जमा केलं अन्...
गुजरातमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.एका पाच वर्षीय चिमुकलीचा नरबळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने कुऱ्हाडीने पाच वर्षांच्या मुलीची गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्या मुलीचे रक्त या व्यक्तीने एका मंदिराच्या पायऱ्यांवर अर्पण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना गुजरातमध्ये घडली आहे.
गुजरातमधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली तहसीलमधील पनेज गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेत बुडालेल्या एका तांत्रिकाने एका निष्पाप पाच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करून तिचा बळी दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असे सांगितले जात आहे की, हा सारा प्रकार पमेज गावामध्ये सोमवारी दुपारी घडला. रविवारी सकाळी मुख्य आरोपी लाला तडवी याने या मुलीचं तिच्या राहत्या घरातून आईसमोरच अपहरण केलं. तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथल्या एका मंदिरासमोर तांत्रिक विधी करू लागला. यानंतर त्याने मुलीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर हत्येनंतर आरोपीने मुलीच्या रक्ताचे डाग त्याच्या घरात बांधलेल्या मंदिरात अर्पण केले.
हत्येनंतर तांत्रिक लालूने मुलीच्या धाकट्या भावाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत होता. पण गावकऱ्यांनी त्याला पाहिले आणि पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
एएसपी छोटा उदयपूर गौरव अग्रवाल यांनी सांगितले की, या घटनेच्या वेळी मुलीची आई कपडे धुण्यासाठी गेली होती आणि त्याच दरम्यान तांत्रिकाने मुलीला उचलून आपल्या घरी नेले. हत्येनंतर त्याने आपल्या घरातील मंदिरात मुलीचे रक्त अर्पण केले.
छोटा उदयपूर हा आदिवासी बहुल भाग आहे. जिथे अंधश्रद्धेशी संबंधित घटना अजूनही समोर येत राहतात हे उल्लेखनीय आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पोलीस उपनिरिक्षक (एएसपी) गौरव अग्रवाल यांनी आरोपी हा तांत्रिक-मांत्रिक असल्याचे वाटत नाही, असे म्हटले आहे. तडवीने ही हत्या करण्यामागील खरा हेतू असून समोर आलेला नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ताडवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.