Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

बकवालनगर येथील अमोल बारे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. घटस्फोटाच्या वादातून ही हत्या करण्यात आली. अल्पवयीनासह चार आरोपींना 1800 किमी पाठलागानंतर जालन्यातून अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 08, 2026 | 03:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीच्या घटस्फोटाच्या वादातून तरुणांची हत्या
  • अल्पवयीनासह चार आरोपींचा सहभाग
  • 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपींना जेरबंद
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका ३० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 1800 किमी पाठलागानंतर एका अल्पवयीनांसह चार आरोपीना जालना येथून अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अमोल एकनाथ बारे (30) असे आहे. हत्येची घटना बकवालनगर येथे घडली होती.

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज

काय नेमकं प्रकरण?

अमोल एकनाथ बारे (30) याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी तो आपल्या पत्नीला घटस्फोट मागत होता. अमोलची पत्नी आणि युवराजची पत्नी चुलत बहिणी आहेत. त्यामुळे युवराज दाम्पत्याने आपल्या पत्नीला घटस्फोटासाठी राजी करावे असे अमोल त्यांना सांगत होते. मात्र अमोलच्या पत्नीने नकार दिल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये वाद वाढत गेला.

काय घडलं नेमकं?

४ जानेवारीला रात्री अमोलने युवराजला फोन केले आणि फोन करून शिवीगाळ व धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या युवराजने प्रमोद वाकचौरे आणि शुभम राठोड यांना बोलावून घेतले. अमोलला दुचाकीवर बसवून ओअॅसिस चौक परिसरात नेण्यात आले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. प्रमोदने धारदार चाकूने अमोलच्या छाती, गळा व पाठीत वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी हत्येनंतर तेथून फरार झाले.

पोलिसांचा 1800 किमी पाठलाग आणि…

अमोलची हत्या केल्यानंतर आरोपी हे सतत आपले ठिकाण बदलत होते. नवीन सिमकार्डचा वापर करत होते त्यामुळे त्यांचा लोकेशन ट्रॅक करणे पोलिसांपुढे आवाहन होते. पैसे संपल्याने जालना येथे रक्कम गोळा करून ते परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन व गोपनीय माहितीनुसार जालना,अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह 13 जिल्ह्यांत शोधमोहीम राबवली. अखेर 1800 किलोमीटरचा प्रवास करून जालना बसस्थानक परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली.

Dharashiv Crime: पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; आधी दारू पाजली, नंतर मिरची पावडर टाकून…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: घटस्फोट आणि कौटुंबिक वादामुळे.

  • Que: पोलिसांनी कसा तपास केला?

    Ans: तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन व गोपनीय माहितीच्या आधारे.

  • Que: आरोपी कुठे पकडले?

    Ans: जालना बसस्थानक परिसरातून.

Web Title: Chhatrapati sambhajinagar young man murdered due to a family dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या
1

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या

सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर! जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’; वाचा कोणाकोणाचे अर्ज बाद?
2

सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर! जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’; वाचा कोणाकोणाचे अर्ज बाद?

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती
3

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती

Chhatrapati Sambhajinagar: ‘कचरा’ करणाऱ्यांची आता गय नाही! चार प्रकारांत वर्गीकरण अनिवार्य; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
4

Chhatrapati Sambhajinagar: ‘कचरा’ करणाऱ्यांची आता गय नाही! चार प्रकारांत वर्गीकरण अनिवार्य; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.