अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. नितीन संजय यादव यांनी दिवंगत अजित पवार यांच्याअपघातासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकारात मागवले होते. यादव यांनी यापूर्वी २८ जानेवारी २०२६ यादिवशीचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सकाळी ६ ते ९ काळातील सीसीटीव्ही फुटेज मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतुकालयाला माहिती अधिकारात अर्ज केला होता. मात्र या अर्जाचे समाधानकारक उत्तरे न आल्याने यादव यांनी नागरी विभाजन सुरक्षा ब्युरो यांच्याकडे अपील केले होते. मात्र त्यांनी मागितलेली माहिती सर्वसामान्यांना देता येत नसून ती माहिती तपास यंत्रणांना दिली आहे असे उत्तर देत यादव यांचे अपील फेटाळून लावले.
दुसरीकडे यादव यांनी अजित दादांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी या बंगल्यापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत केलेल्या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, यासंबंधी माहिती अधिकारात अर्ज केला होता. मात्र सदर माहिती सार्वजनिक कामाची व हितासंबंधी नाही, असे सांगत गृह विभागाच्या मुंबई पोलिसांनी या अर्जाला उत्तर दिले आहे.
एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्ही.एस.आर कंपनीला वाचवत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. असताना दुसरीकडे खुद्द राज्याची उपमुख्यमंत्री यांचे अपघाती निधन झाले असताना व हा नक्की अपघात होतात की घातपात होता या संभ्रमात अजितदादांचे कार्यकर्ते असताना, अजित पवार हे शासकीय व सार्वजनिक पदावर होते. त्यांचे देवगिरी ते निवासस्थान देखील शासकीय आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी करूनही ते दिले जात नसल्याने आणखी संभ्रम वाढला आहे.
Ans: बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) २८ जानेवारी २०२६ रोजीचे सीसीटीव्ही फुटेज मागवले होते.
Ans: मागितलेली माहिती सर्वसामान्यांना देता येत नाही आणि ती संबंधित तपास यंत्रणांना सुपूर्द करण्यात आली आहे, असे कारण देत नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) यादव यांचे अपील फेटाळून लावले.
Ans: देवगिरी बंगला ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज हे सार्वजनिक कामाचे व सार्वजनिक हितासंबंधी नसल्याचे सांगत गृह विभागाच्या मुंबई पोलिसांनी ते देण्यास नकार दिला आहे.






