काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवारी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिची मुलगी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता कोणाला कसलीही माहिती न देता दूर निघून गेली असे तक्रारीत त्यांनी सांगितले. कारवाई करतांना पोलिसांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले होते. त्यामध्ये पीडित मुलगी ही घर सोडून तिच्या आजीच्या घरी गेल्याचं उघड झालं.
Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल
त्यांनतर पोलीस मुलीच्या आजीच्या घरी दाखल झाले. आजीची चौकशी केली असता तिने सांगितले की, मुलगी खूपच भयभीत झाली होती आणि नंतर ती म्हणाली की, तिला तिच्या कुटुंबियांसोबतच राहायचं नाही आहे. तिचा छळ देखील होऊ लागला होता. त्यांनतर आजीनेच मुलीला सिगडी परिसरातील एका ओळखीच्या घरी सोडले होते.
पोलीस पथकाने मुलीला एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरातूनच सुरक्षितपणे तिथून बाहेर काढले. पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली, तिने सांगितले की ४ फेब्रुवारी रोजी रात्री तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर पीडिता घाबरून तिच्या आजीच्या घरी पळून गेली होती.
आरोपी अटकेत
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 65 (1) आणि पोक्सो अंतर्गत कलम 3/4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.
गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चिमट्याने…; चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून बेदम मारहाण
हरियाणातील गुरुग्राम शहरात सोमवारी एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आले आहे. एवढेच नाही तर गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चमच्यांनी चटके दिल्याचे समोर आले आहे. या अमानुष छळामुळे चार मुले गंभीर जखमी झाले आहे.
Ans: सावत्र वडिलांनी
Ans: आपल्या आजीच्या घरी
Ans: ३२ वर्षीय नराधम सावत्र वडिलांना अटक केली






