crime (फोटो सौजन्य: social media)
बिहार: बिहारमधील नवादा जिल्ह्यात समय गावातील एका घटनेने खळबळ उडाली आहे. एक महिला तिच्या तीन मुलांना सोडून तिच्या प्रियकरासोबत पळ काढला. महिलेने घरात ठेवलेले लाखो रुपयांचे जमिनीचे कागदपत्र आणि दागिनेही पळवून नेले. तिच्या पतीने मुफस्सिल पोलिस ठाण्यात यासंधर्भात तक्रार दाखल केली आहे. अर्ज मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आणि एफआयआर नोंदवला आहे.
भांड्याकुंड्यांसह बायको गेली घर सोडून, टोळक्यासह नवरा लोखंडी रॉड घेऊन घुसला घरात अन्….
काय आहे प्रकरण?
गोविंद कुमार यांचे 12 जुलै 2016 रोजी सपना कुमारीशी लग्न झाले होते. या दोघांना तीन मुले आहेत. 8 वर्षांची शिवानी कुमारी, 6 वर्षांची सौम्या कुमारी आणि 2 वर्षांचा अमन कुमार. हा कुटुंब समय गावात भाड्याने राहत होते. गोविंद कामाने चेन्नईला राहत होता. घरमालकाने गोविंदला फोन करून सांगितले की, ‘त्याची पत्नी रोज एका तरुणाला भेटते. तो तरुण रात्री येतो आणि सकाळपर्यंत घरात राहतो आणि सकाळी जातो’. यानंतर गोविंदाने त्याच्या पत्नीला समजावून सांगितले. पण, जेव्हा तो जेव्हा तो चेन्नईहून नवादा येथे परतला तेव्हा त्याची पत्नी घरातून गायब होती. त्यांने आपल्या सामानाशी शोधाशोध केली. तेव्हा त्याला घरात एक फोटो सापडला ज्यामध्ये त्याची पत्नी एका तरुणासोबत दिसली. पतीचा आरोप आहे की, फोटोतील व्यक्ती डॉक्टर पंकज कुमार आहे. त्याची पत्नी पंकज कुमार नावाच्या एका डॉक्टरवर प्रेम करते आणि त्याच्यासोबत ती पळून गेली आहे. तिच्यासोबत कोट्यवधी रुपयांचे जमिनीचे कागदपत्रे, सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूही नेल्या आहेत.
डॉक्टर पंकज कुमार यांच्याशी एका वृत्तसंस्थेने संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितले की, हा फोटो चुकीचा आहे. चुकीच्या गोष्टी सांगून मला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एसएचओ मृत्युंजय कुमार म्हणाले की, अर्ज मिळाल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि एफआयआर नोंदवण्यात आला आहे.