Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर

Dharashiv Accident News: तुळजाभवानीचे दर्शन अवघ्या काही अंतरावर असतानाच महामार्गावर काळाने घाла घातला! पायी जाणाऱ्या भाविकांच्या घोळक्यात भरधाव कंटेनर शिरल्याने एक जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मंदिरापर्यंत पोहोचण्याआधीच भाविकांवर ओढवलेल्या या भीषण संकटाची थरारक कहाणी

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 23, 2026 | 05:03 PM
Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर

Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर

Follow Us
Follow Us:
  • नळदुर्ग बायपासजवळ पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरने जोरदार धडक दिली.
  • या दुर्घटनेत 30 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी.  
  • कर्नाटकच्या बसवकल्याणहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी प्रवास सुरू होता.
 

Dharashiv Accident News: : मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. आई तुळजाभवानीचे दर्शन अवघ्या काही तासांच्या अंतरावर असतानाच, पायी जाणाऱ्या भाविकांच्या एका समूहाला भरधाव कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे धाराशिव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा:Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

नेमकी कशी घडली दुर्घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बसवकल्याण येथून काही भाविकांचा समूह आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी मार्गस्थ झाला होता. हा ग्रुप तुळजापूरच्या दिशेने चालला असताना, मुंबई-हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग बायपासजवळ पोहोचला. त्याच वेळी हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरवरील चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला हा कंटेनर रस्ते मार्गाने पायी चालणाऱ्या भाविकांच्या घोळक्यात शिरला आणि त्यांना जोरदार धडक दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महामार्गावर एकच तारांबळ उडाली.

एक ठार, सहा जण गंभीर जखमी

या भीषण अपघातात बसवकल्याण येथील रहिवासी असलेले गुरुसिद्ध बाबुराव कुंभार (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह इतर सहा भाविक या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायांना तीव्र दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना पोलिसांच्या मदतीने तात्काळ नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: Satara News: ‘तो’ आघात सहन झाला नाही! मित्राच्या विरहाने ग्रासलेल्या पूजाने वसतिगृहात संपवली जीवनयात्रा

पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरून तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या हजारो भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. रात्रीच्या वा पहाटेच्या वेळी महामार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे भाविकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आणि पायी प्रवास करणाऱ्या भाविकांनी विशेष काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा भीषण अपघात कुठे घडला आहे?

    Ans: मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग बायपासजवळ (धाराशिव) हा अपघात घडला.

  • Que: भाविक कुठे चालले होते आणि काय घडले?

    Ans: कर्नाटकच्या बसवकल्याणवरून तुळजापूरकडे पायी दर्शनासाठी चाललेल्या भाविकांना एका भरधाव कंटेनरने मागून धडक दिली.

  • Que: या दुर्घटनेत कशा प्रकारचे नुकसान झाले?

    Ans: या अपघातात गुरुसिद्ध बाबुराव कुंभार यांचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Dharashiv tuljapur walking pilgrims container accident news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

जळगाव हादरले! जामनेर तालुक्यात मका काढणीच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; तीन लहान मुलांचे पितृछत्र हरपले
1

जळगाव हादरले! जामनेर तालुक्यात मका काढणीच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; तीन लहान मुलांचे पितृछत्र हरपले

Mumbai News: साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड
2

Mumbai News: साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड

जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार
3

जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार

कराडजवळ भीषण अपघात; दर्शन घेऊन परतले, पण घरी पोहोचलेच नाहीत,चौघांचा दुर्दैवी अंत
4

कराडजवळ भीषण अपघात; दर्शन घेऊन परतले, पण घरी पोहोचलेच नाहीत,चौघांचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.