काय घडलं नेमकं?
मृत तरुणी मंडी जिल्ह्यातील सरकाघाट उपविभागातील गोपालपूर गावची रहिवासी होती. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी बस स्टॉपच्या दिशेने चालली होती. याच दरम्यान, त्याच गावातील विकास (३६) नावाच्या व्यक्तीने तिचा रस्ता अडवला. विकास हा अमली पदार्थांच्या आहारी गेलेला असून तो गेल्या काही दिवसांपासून या तरुणीचा पाठलाग करत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एकतर्फी प्रेमातून किंवा तरुणीने त्याला नकार दिल्याच्या रागातून विकासने अचानक तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र नराधम विकासने तिच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर इतक्या वेगाने वार केले की तिचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तासाभराच्या शोधमोहिमेनंतर, गोपालपूरच्या गावकऱ्यांनी आरोपी विकासला एका शेतात लपलेले असताना शोधून काढले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मंडीचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Pune Crime: पुण्यात झोपण्याच्या वादातून खून! वॉचमनने सहकाऱ्याचा गळा आवळून केली हत्या
Ans: हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ही घटना घडली.
Ans: एकतर्फी प्रेम आणि नकाराचा राग हे कारण असल्याचा संशय आहे.
Ans: गावकऱ्यांनी शेतात लपलेल्या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.






