Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई

एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 27 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 02, 2026 | 03:22 PM
एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई

एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 27 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार २४ मार्च २०२६ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाचाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार एक व्यक्ती एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी चारचाकी वाहनातून वाकड येथील विनोदे वस्ती परिसरात येणार असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी कारवाई केली.

 

अतुल शंकर बालगुडे (वय ३५, रा. पायथरगाव, ता. मावळ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ (किंमत ४ लाख २० हजार रुपये) तसेच ३ लाख २४ हजार २०० रुपयांची चारचाकी व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पुढील तपासादरम्यान त्याचा साथीदार शाहरुख उर्फ सदाम इजवाल अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २०० ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत २० लाख रुपये) जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाचाळ करत आहेत. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त बालासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हृषीकेश घाडगे आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यानी ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा : गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराने ठाणे हादरलं

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड

अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा (प्रेमप्रकरण) तपास सुरू असताना याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. पुर्ण शहरात पसरलेल्या या रॅकेटमधून धक्कादायक माहिती समोर आली असून, ड्रग्ज विक्री करणारे तसेच ते घेणारे अशा ७६ जणांची माहिती पोलिसांकडे आली आहे. आता हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आरोपी पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. उत्तमनगर पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. मुलगी प्रेमप्रकरणातून गेल्याचे समजले होते. गेल्या काही महिन्यांपासून या गुन्ह्यातील आरोपी राठ्या राठोड हा फरार होता. वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांच्याकडून हद्दीतील सराईतांची ‘परेड’ घेण्यात आली होती. तेव्हा त्यांनी हद्दीत काही बेकायदेशीर असेल तर कळविण्याचे सूचवले होते. तेव्हा पोलिस निरीक्षक क्षिरसागर यांना माहिती मिळाली त्यानूसार पोलिसांनी तिघांना अटक केली. तर, चौघांचा शोध सुरू आहे.

Web Title: Hinjewadi police have arrested two people for selling md drugs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Drugs Case

संबंधित बातम्या

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई
1

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
3

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प
4

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.