Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा पुण्यात ‘हिट अँड रन’; पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले, एकाचा मृत्यू

अजूनही पुण्यात पोर्शे प्रकरण ताजेत असताना पुन्हा एकदा हिट अँड रनची केस समोर आलीये. मध्यरात्रीची घटना असून यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनाच उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे आता समोर आलेय.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 08, 2024 | 07:52 AM
हिट अँड रन प्रकरणात एकाचा मृत्यू

हिट अँड रन प्रकरणात एकाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे: पुणे शहर पुन्हा एकदा हिट अँड रन घटनेने हादरले असून, अज्ञात भरधाव वाहनाने रात्र पाळीवर काम करणाऱ्या  दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवल्याची धक्कादायक घडली आहे. अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेने शहर पोलीस दलात तसेच पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात हा भीषण अपघात मध्यरात्री अडीच ते तीन या वेळेत घडला आहे.

अपघातात पोलीस हवालदार एच. सी. कोळी असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, ते आऊट ऑफ डेंजर असल्याची माहिती देण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे व कोळी हे खडकी पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. ते मार्शल ड्युटी करत होते. रविवारी ते मार्शल ड्युटीवर होते. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बोपोडी चौकातून ते रेल्वे ब्रिजच्या येथून जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागून उडवले. यामध्ये दोघे खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यात गंभीर मार लागल्याने कोळी यांचा मृत्यू झाला. तर शिंदे हे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली. दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या भागात सीसीटीव्ही नसल्याने ते वाहन कोणते याचाही अंदाज येत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान पोलीस त्या वाहनाचा युद्ध पातळीवर शोध घेत आहेत.

दरम्यान पुण्यात कल्यानीनगर येथील हायप्रोफाईल अपघात, त्यानंतर गंगा धाम चौकात झालेला अपघात अश्या सातत्याने होत असलेल्या अपघाताने हदरत असताना ड्युटीवर असलेल्या पोलिसांसोबतच हिट अँड रनची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Hit and run in pune again 1 police constable dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 07:51 AM

Topics:  

  • Hit and Run
  • pune news

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.