Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू

दीपाली तांबे या मंचर येथील रहिवासी असून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शासनाच्या जनगणना संदर्भातील कामासाठी त्या सकाळी वाहनाने निघाल्या होत्या. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गालगत कान्हे फाटा परिसरात त्यांच्या वाहनाला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 01:21 PM
Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू

Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : शासकीय जनगणना कामासाठी जात असलेल्या एका शिक्षिकेचा भरधाव कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली. या दुर्घटनेत दीपाली सुजित तांबे (रा. मंचर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे मावळ तालुक्यासह परिसरासह शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली तांबे या मंचर येथील रहिवासी असून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शासनाच्या जनगणना संदर्भातील कामासाठी त्या सकाळी वाहनाने निघाल्या होत्या. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गालगत कान्हे फाटा परिसरात त्यांच्या वाहनाला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आणि दीपाली तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच पोलिसांनाही तत्काळ माहिती देण्यात आली.

Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट खोल दरीत कोसळली; 8 मित्रांची अकाली एक्झिट

दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला. अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत कंटेनर चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तांबे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त

दीपाली तांबे या कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. शासकीय जबाबदारी पार पाडण्यासाठी जात असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने शिक्षक वर्गातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मंचर परिसरातही या घटनेनंतर शोककळा पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील भरधाव अवजड वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून कठोर वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी केली जात आहे.

दुचाकी धडकून एकाचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, काशिळ ते पाली मार्गावर शिरगाव हद्दीत रस्त्यावर पडलेल्या डांबराच्या ढिगाला दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली. शिवाजी पवार (वय ५०, रा. कोर्टी ता. कराड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Web Title: Horrific accident at kanhe phata teacher heading for census duty dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Accident News
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी
1

पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
2

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
3

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
4

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.