Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जळगावात भीषण अपघात; भरधाव कारचा टायर फुटला, नववधूसह तिघांचा मृत्यू

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2026 | 01:34 PM
जळगावात भीषण अपघात; भरधाव कारचा टायर फुटला, नववधूसह तिघांचा मृत्यू

जळगावात भीषण अपघात; भरधाव कारचा टायर फुटला, नववधूसह तिघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

जळगाव : कुटुंबात नुकताच विवाहसोहळा पार पडला होता, त्यामुळे सारे जण आंनदाने घराकडे परत निघाले होते. असे असताना कुटुंबावर काळाचा घाला बसला. नवीन आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या नववधूला घेऊन घराकडे परतणाऱ्या कुटुंबियांच्या वाहनाचा धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर टायर फुटल्याने भीषण अपघात झाला.

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातात गाडीतील अन्य ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

हेदेखील वाचा : Pune Accident : पुण्यात खासगी बसचा थरार; अधी दोन महिलांना धडक दिली अन् थेट…

जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय बालक अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाघळकर परिवारावर दुःखाचा डोंगर

गुजरातमधील वापी येथून लग्नसोहळा आटोपून वऱ्हाड क्रुझरने अकोल्याच्या दिशेने निघाले होते. नुकतेच लग्न पार पडल्यामुळे कुटुंबात उत्साह होता. परंतु जळगावमधील वराड गावाजवळ महामार्गावर धावत्या क्रुझरचे पुढचे टायर फुटले. टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रुझरचा पुढचा भागाचा चुराडा झाला. यामध्ये नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

पुण्यात खासगी बसचा थरार

बाजीराव रस्त्यावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भल्या पहाटे अपघाताचा थरार घडला आहे. अभिनव चौक मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स एका दुचाकीला धडकून नंतर एका इमारतीला जाऊन धडकली. यामध्ये दुचाकीस्वार मायलेकी जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Web Title: Horrific accident in jalgaon speeding car tire bursts 3 people died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Accident News
  • Jalgaon

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू
1

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

पुण्यातील ‘या’ मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसची दुचाकींना धडक; जखमींचा आकडाही आला समोर
2

पुण्यातील ‘या’ मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसची दुचाकींना धडक; जखमींचा आकडाही आला समोर

Paithan Accident : पैठण तालुक्यात भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
3

Paithan Accident : पैठण तालुक्यात भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी
4

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.