Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nandurbar Accident: नंदूरबारमध्ये भीषण अपघात; लग्नाच्या 10 दिवस आधी तरुणाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी वाहन पेटवले

नंदूरबारमध्ये भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला. लग्नाच्या 10 दिवस आधी पत्रिका वाटायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे; संतप्त नागरिकांनी वाहन जाळले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 09:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारचाकी- दुचाकी भीषण धडक; दोन युवक ठार
  • लग्नाच्या 10 दिवस आधी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
  • संतप्त नागरिकांनी अपघातातील वाहन पेटवले
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास भरधाव चारचाकीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. यात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाला रस्त्यावरच आग लावली. ही घटना धानोरा-नंदुरबार मार्गावर लोय फाटा ते वेळावद फाटा जवळ घडली.

Crime News: कामगारांनी सोडून न जाण्यासाठी मालकिणीचाच ‘भलताच’ डाव; मोहोळ पोलिसांकडून गुन्ह्याचा पर्दाफाश

कसा झाला अपघात?

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रोहित आप्पा भिल (वय 22, रा. शिंदे, ता. नंदूरबार) आणि साजन संजय भिल (वय 18,रा.. करजई, पोस्ट डामरखेडा, ता. शहादा) असे आहे. रोहित भिल याच लग्न अवघ्या १० दिवसांवर होता. तो आपल्या मित्रासोबत नातेवाईकांकडे लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघाला होता. नवापूर येथील जमील पठाण याच्या ताब्यातील महिंद्रा झायलो (GJ-16-BB-1552)ही चारचाकी गाडी भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकल (GJ-05-BR-0452)ला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.

अपघात झाल्याचे कळताच धानोरा परिसरातील नागरिक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाला आग लावली. या घटनेने काही काळ घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नंदूरबार उपनगर पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, नंदूरबार उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षकांकडून सुरू आहे.

घटनास्थळी रस्त्याचे काम सुरु

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असूनही ठेकेदारांकडून कोणतेही सूचनाफलक, दिशादर्शक चिन्हे किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला असून या निष्काळजीपणामुळेच हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Bhandara Accident: हृदयद्रावक घटना! एसटी बसने दुचाकीला धडक, वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: नंदूरबार जिल्ह्यातील धानोरा-नंदुरबार मार्गावर.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला.

  • Que: नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत वाहनाला आग लावली.

Web Title: Horrific accident in nandurbar young man dies just 10 days before his wedding irate citizens set vehicle ablaze

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Nandurbar

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
3

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
4

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.