मालकिणीचा भलताच डाव, अडकली पोलिसांच्या जाळ्यात
पुणे पोलीस दलात खळबळ, ‘त्या’ दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?
नक्की काय घडले?
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुगंधा विलास ढेरे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास, त्यांचे पती यवतमाळला गेले असताना, त्यांच्याकडे कामाला असलेले सालगडी शिवदास यशवंत मडावी आणि त्यांची पत्नी रंजना मडावी (रा. चिरादेवी, जि. चंद्रपूर) यांनी घरात घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यांचे हात-पाय बांधून, मारहाण करून कपाटातील ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांचे पथक तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातील चिरादेवी येथे रवाना झाले. तेथून संशयित सालगड्यांना ताब्यात घेऊन मोहोळला आणून सखोल चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशी दरम्यान फिर्यादीच्या कथनात आणि वस्तुस्थितीत तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला.
वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त
कसून चौकशी केल्यावर सत्य बाहेर
पोलिसांनी जेव्हा फिर्यादी सुगंधा ढेरे यांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी सत्य कबूल केले. “सालगड्यांनी काम सोडून जाऊ नये” या एकमेव उद्देशाने त्यांनी हा चोरीचा आणि मारहाणीचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. एका खोट्या तक्रारीमुळे पोलीस प्रशासनाचा वेळ आणि श्रम वाया गेल्याने आता संबंधित महिलेवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नये, असे आवाहन मोहोळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.






