Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारचे टायर फुटल्याने कार उलटून एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील सीआरओकडून समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे पोलिस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2026 | 01:25 PM
ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला धडक; वृद्धाचा मृत्यू

ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला धडक; वृद्धाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

बुलढाणा : समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे स्कॉर्पिओ कारचे टायर फुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एक जण ठार, तर आठ जण किरकोळ जखमी झाले. अमन साहू (वय २५) यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील सीआरओकडून समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे पोलिस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिस उपनिरीक्षक अनिता इर्शीद यांच्या नेतृत्वाखालील पथक दुपारी १२.०५ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी एक कार (सीजी ०८ / बीसी ४४०५) ही रस्त्यावर पलटी झालेल्या अवस्थेत आढळून आली. कारचालक हेमंत विश्वकर्मा (वय २४, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) यांच्याकडे चौकशी केली असता, ते आपल्या मित्रांसह नाशिकहून नागपूरकडे जात असल्याचे सांगितले.

प्रवासी छत्तीसगड राज्यातील

प्रवासादरम्यान कारच्या पाठीमागील डाव्या बाजूचे टायर अचानक फुटले. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पलटी होऊन हा अपघात झाला. अपघातात तीकेस बंदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, हेमंत विश्वकर्मा, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा आणि नवीन साहू यांना दुखापत झाली. जखमींना अॅम्ब्युलन्सच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालय, सिंदखेडराजा येथे हलवण्यात आले. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ क्रेनच्या सहाय्याने हटवून दुसरबीड टोलनाका येथे लावण्यात आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली असून, घटनास्थळी शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खराब रस्त्यामुळे चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू

नाशिक गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते खोदून (Nashik Pothole Deaths) ठेवले आहेत. उन्हाळ्यात रस्त्यांची अपेक्षित डागडूजी किंवा नवीन कामे न करता, महापालिका प्रशासन आणि सरकारने एकाच वेळी सर्व कामे हातात घेतल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नाशिककरांना रस्त्यांवरून चालताना जीवघेणी कसरत करावी लागत असून, गेल्या चार महिन्यांत वेगवेगळ्या अपघातांत खड्यांमुळे तब्बल पाच निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. या दुर्दैवी मृतांमध्ये निलेश कोतकर, प्रभाकर निकम, दिपाली बेळे आणि प्रवीण गायकवाड यांचा समावेश आहे.

Web Title: Horrific accident on the samruddhi mahamarg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Accident News
  • Samruddhi Mahamarg

संबंधित बातम्या

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
1

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
2

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
3

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!
4

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.