Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या; कोयत्याने चेहरा, गळ्यावरही केले वार

स्वामी मळा परिसरात राहणार्‍या दिलीप धावोत्रे याचा सन २०१० मध्ये ओगलेवाडी येथील मनिषा हिच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. धावोत्रे पती-पत्नी हे दोघेही कोरोची येथील कारखान्यात काम करत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2025 | 02:40 PM
धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या; कोयत्याने चेहरा, गळ्यावरही केले वार

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या; कोयत्याने चेहरा, गळ्यावरही केले वार

Follow Us
Follow Us:

इचलकरंजी : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.7) उघडकीस आली. पतीने पत्नीवर कोयत्याने चेहर्‍यावर, गळ्यावर व मानेवर वर्मी घाव घालून खून केला. मनिषा दिलीप धावोत्रे (वय ४०, रा. स्वामी मळा) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती दिलीप मनोहर धावोत्रे (वय ४५) हा घटनेनंतर स्वत:हून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मनिषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे (रा.ओगलेवाडी ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.

हेदेखील वाचा : Akshay Shinde Encounter: ‘… त्यामुळे आम्हाला केस लढवायची नाही’; अक्षयच्या पालकांची भूमिका, कोर्टात काय घडलं?

स्वामी मळा परिसरात राहणार्‍या दिलीप धावोत्रे याचा सन २०१० मध्ये ओगलेवाडी येथील मनिषा हिच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. धावोत्रे पती-पत्नी हे दोघेही कोरोची येथील कारखान्यात काम करत होते. दिलीप हा पत्नी मनिषा हिच्यावर वारंवार चारित्र्यावरुन संशय घेत होता. त्यातूनच त्यांच्यात वाद होऊन दिलीप हा मनिषाला मारहाणही करत होता. मुलांनाही मारहाण करुन त्रास देत असल्याने काही वर्षांपासून दोन्ही मुले कराड येथे मावशीकडे शिक्षणासाठी जाऊन राहिले होते.

मनिषा हिने पतीकडे दारु सोडण्यासाठी तगादा लावला होता. दोन दिवसांपूर्वी दिलीप हा पंढरपूर येथे दारु सोडण्याचे औषध आणण्यासाठी गेला होता. तो बुधवारी परतला. गुरुवारी रात्री दिलीप आणि मनिषा यांच्यात पुन्हा वाद झाल्याची शक्यता आहे. त्यातूनच मनिषा ही झोपली असताना पहाटेच्या सुमारास दिलीप याने अत्यंत निर्दयपणे कोयत्याने मनिषाच्या चेहरा, गळा व मानेवर वर्मी वार केले. आठपेक्षा अधिक वर्मी वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. खूनानंतर दिलीप हा स्वत:हून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने पत्नीचा खून केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसही हडबडून गेले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सचिन पाटील यांच्यासह पथकाने धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेदेखील वाचा : 5 हजारांची लाच घेणं भोवलं; एसीबीने ‘जीएसटी’ कार्यालयातील कर निरीक्षकाला रंगेहात पकडलं

Web Title: Husband killed his wife incident in ichalkaranji nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • crime news
  • Kolhapur Crime
  • Murder in Ichalkaranji

संबंधित बातम्या

Mumbai News: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने सुनेचे लज्जास्पद कृत्य, होणाऱ्या सासूचे माॅर्फ्ड फोटो केले व्हायरल
1

Mumbai News: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने सुनेचे लज्जास्पद कृत्य, होणाऱ्या सासूचे माॅर्फ्ड फोटो केले व्हायरल

दारु पिताना वाद, तीस वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून; शिरुर तालुक्यातील घटनेनं खळबळ
2

दारु पिताना वाद, तीस वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून; शिरुर तालुक्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात खळबळ! स्टील व्यवसायिकाच्या दुकानावर गोळीबार; आरोपी दुचाकीवरून फरार
3

पुण्यात खळबळ! स्टील व्यवसायिकाच्या दुकानावर गोळीबार; आरोपी दुचाकीवरून फरार

Triple Murder Case: १६ वर्षांच्या मुलाने भाऊ, वहिणी आणि ३ वर्षांच्या भाच्याची केली निघृण हत्या, धक्कादायक कारण समोर…
4

Triple Murder Case: १६ वर्षांच्या मुलाने भाऊ, वहिणी आणि ३ वर्षांच्या भाच्याची केली निघृण हत्या, धक्कादायक कारण समोर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.