संग्रहित फोटो
पुणे : राज्यात लाच घेणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. लाच घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातचं आता वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील कर निरीक्षकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागने पकडले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषारकुमार दत्तात्रय माळी (वय ३३) असे कर निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी माळी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती.
तक्ररादार वकिलाचा अशील व्यापारी आहे. व्यापाऱ्याचा जीएसटी क्रमांक रद्द करण्यात आला होता. जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी वकिलाने अशिलामार्फत जीएसटी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. माळीने वकिलाकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर वकिलाने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक सापळा लावून वकिलाकडून पाच हजारांची लाच घेणाऱ्या माळी यांना पकडले. पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हे सुद्धा वाचा : Pune Fraud Case : एलआयसी पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना गंडा, तब्बल 30 बँकांचे…
चारशे रुपयांची लाच घेणे अंगलट
राज्यात लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोणतीही त्रुटी काढल्याशिवाय वाहनांचे हस्तांतरण (ट्रान्सफर ऑफ ओनरशिप) करून देण्यासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने 400 रुपयांची लाच मागितली. दलालाच्या माध्यमातून पैसे घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने दोघांनाही पकडले. या कारवाईने ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. अश्फाक मेहमूद अहमद (वय 57) आणि मिर्झा असराग अकरम बेग (वय 30) अशी आरोपींची नावे आहेत.
पाच हजारांची लाच घेताना पकडले
राज्यात लाच घेणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. लाच घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी तलाठ्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. फुरसुंगीतील तलाठी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली. याप्रकरणी ठकसेन उर्फ तुषार मारुती गलांडे (वय 42, रा. नारायणनगर, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वाये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.