Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! पत्नीचा गळा आवळून पतीने केला खून; चारित्र्याच्या संशयावरून घडलं सारं काही…

रागाच्या भरात संतोषने सुमन उर्फ मंगलचा गळा आवळून खून करून तिथून पलायन केले. खूनामागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून लवकरात लवकर खुनाचे कारण हे स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2025 | 03:08 PM
नणंदेचं 'ते' प्रकरण उघड केलं म्हणून नवरा संतापला; बायकोच्या भुवयांवरून ट्रिमरच फिरवला

नणंदेचं 'ते' प्रकरण उघड केलं म्हणून नवरा संतापला; बायकोच्या भुवयांवरून ट्रिमरच फिरवला

Follow Us
Close
Follow Us:

मायणी : कलेढोण (तालुका खटाव) येथील मंगल संतोष जाधव या महिलेचा पती संतोष सखाराम जाधव यांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सखाराम जाधव (मूळ गाव नरसिंगपूर, तालुका वाळवा) येथील आहे.

सध्या तो आपली पत्नी सुमन उर्फ मंगल संतोष जाधव हिच्यासह आपली सासरवाडी कलेढोण येथे वास्तव्यास आहे. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. संतोष हा नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे वारंवार त्यांच्यात खटके उडत होते. मंगलचा भाऊ प्रशांत माने व त्याची पत्नी उषा नेहमीच या दोघांना समजावून सांगून यांचे भांडण मिटवत होते. बुधवारी (दि. १९) रोजी रात्री नऊच्या सुमारास संतोष आणि मंगल यांच्यात वादावादी सुरू होती.

मंगलचा भाऊ व वहिनी यांनी दोघात समेट घडवून आणला होता. परंतु, रागाच्या भरात संतोषने सुमन उर्फ मंगलचा गळा आवळून खून करून तिथून पलायन केले. खूनामागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून लवकरात लवकर खुनाचे कारण हे स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्यासह प्रवीण सानप, अमोल चव्हाण, अजित काळेल यांच्या टीमने संतोषला इस्लामपूरमधून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील पुढील तपास करत आहेत.

दरवाजा उघडा दिसल्याने प्रकार उघड

नेहमीप्रमाणे प्रशांत व त्याची पत्नी दोघेही पहाटे साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले असता मंगलच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले तर मंगल निपचित पडलेली त्यांना दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मंगलचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मायणी पोलिसांना कळवले.

Web Title: Husband murder his wife incident in mayani satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Murder Case
  • Satara News

संबंधित बातम्या

कोल्हापुरात खळबळ! रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
1

कोल्हापुरात खळबळ! रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Crime News Updates : बीड हादरलं! मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने केली हत्या
2

Crime News Updates : बीड हादरलं! मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने केली हत्या

आंदेकरांच्या खुनाचा बदला थांबला, पोलिसांनी टोळीचा गेमच उधळला; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
3

आंदेकरांच्या खुनाचा बदला थांबला, पोलिसांनी टोळीचा गेमच उधळला; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Crime News Updates : बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या
4

Crime News Updates : बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.