Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics : जावळीत संघर्षाची ठिणगी ; शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे !

Satara Politics : जावळी तालुक्यात विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांवरून रंगलेल्या राजकीय संघर्षाने वेगळे वळण घेतले आहे. आखाडे येथील कार्यकर्त्यांशी झालेल्या कथित धक्काबुक्की व दमदाटीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत, कार्यकर्त्यांच्या बाबतीत कोणतीही दहशत सहन केली जाणार नाही

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 17, 2026 | 09:24 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Satara Politics : जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीतील राजकीय घडामोडींसह पुनर्वसन, पर्यटन विकास, पालकमंत्रिपद आणि जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

जावळीतील विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांमध्ये सुरुवातीपासून आपण हस्तक्षेप केला नाही. गावपातळीवर चर्चा करून ठराव पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. अनेक गावांचे ठराव चर्चेनंतर पाठविण्यात आले आहेत. मात्र आखाडे येथील प्रकारानंतर कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याने आपण भूमिका घेतल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड

आखाडे येथील कार्यकर्त्यांना विरोधकांकडून दमदाटी आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः तेथे जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र त्याचे रूपांतर दहशतीत होऊ नये. कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

“संघर्ष हा राजकारणाचा भाग आहे. आम्हीही संघर्षातूनच पुढे आलो आहोत. त्यामुळे कोणाकडूनही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल,” असे शिवेंद्रसिंहराजे यांनी ठणकावून सांगितले.

पुनर्वसनासाठी प्रशासकीय हालचाली

वाई व जावळी परिसरातील काही गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरही त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी चर्चा केली. संबंधित गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित भूमिका घेतली असून, गावठाणासह आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे प्रस्ताव लवकरच मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठोसेघर-भांबवलीचा पर्यटन नकाशा विस्तारण्याचा प्रयत्न
ठोसेघर आणि भांबवली परिसराच्या पर्यटन विकासासाठी शासनाकडून साडेसहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. केवळ ठोसेघर धबधबा हा केंद्रबिंदू न ठेवता परिसरातील इतर निसर्गस्थळे आणि पर्यटनक्षेत्रांमध्येही सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रस्ते, पर्यटक सुविधा आणि अन्य पायाभूत कामांसाठी प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Satara : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश, ठोसेघर-कुसूंबी पर्यटन विकासाचाही आढावा

पालकमंत्रिपदाचा विषय संपला

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे द्यावे, अशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेली मागणी चर्चेत आली होती. त्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी या विषयाला फारसे महत्त्व न देता भाजपच्या वरिष्ठ पातळीवर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या यापूर्वीच झाल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या पालकमंत्रिपदात बदल होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेबाबत सावध पवित्रा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबतही शिवेंद्रसिंहराजे यांनी सध्या कोणतेही राजकीय भाकीत करण्यास नकार दिला. मतदार याद्या, त्यावरील हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असली तरी अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतरच बँकेच्या राजकारणाबाबत भूमिका मांडणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.
जावळीतील सोसायटी ठरावांच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला आहे.

Web Title: Satara politics spark of conflict in jaoli shivendraraje stands firmly behind his supporters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara News : सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वेलंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ‘घर-घर वृक्षारोपण’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Satara News : सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वेलंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ‘घर-घर वृक्षारोपण’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात; शंभूराज देसाईंची सावध भूमिका
2

सातारा पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात; शंभूराज देसाईंची सावध भूमिका

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड
3

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड

Satara : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश, ठोसेघर-कुसूंबी पर्यटन विकासाचाही आढावा
4

Satara : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश, ठोसेघर-कुसूंबी पर्यटन विकासाचाही आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.