Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीच्या अफेअरचा संशय आणि पतीने लढवली अजब शक्कल, थेट चप्पलमध्ये लावला GPS ट्रॅकर अन् असे पकडले रंगे हात

पाटणा येथे एका पतीने पत्नीच्या चप्पलमध्ये GPS लावून तिला प्रियकरासोबत रंगेहात पकडले. या फिल्मी प्रकरणाचा थरार आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 08, 2026 | 07:18 PM
पत्नीच्या अफेअरचा संशय आणि पतीने लढवली अजब शक्कल (Photo Credit- X)

पत्नीच्या अफेअरचा संशय आणि पतीने लढवली अजब शक्कल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • पत्नीच्या अफेअरचा संशय आणि पतीने लढवली अजब शक्कल
  • थेट चप्पलमध्ये लावला GPS ट्रॅकर
  • अन् असे पकडले रंगे हात
Husband Catches Wife Affair: बिहारची राजधानी पाटणा येथील फुलवारी शरीफ परिसरात एका पतीने आपल्या पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी चक्क तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने तिच्या चप्पलमध्ये गुपचूप GPS ट्रॅकर बसवले आणि त्याद्वारे तिला प्रियकरासोबत रंगेहात पकडले. या फिल्मी थरारामुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

चप्पलमध्ये GPS आणि मोबाईलवर ट्रॅकिंग

मिळालेल्या माहितीनुसार, एकता नगरमधील एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या वर्तणुकीवर गेल्या काही दिवसांपासून संशय होता. हा संशय खरा आहे की खोटा, हे तपासण्यासाठी त्याने एक अनोखी शक्कल लढवली. त्याने पत्नीच्या नकळत तिच्या चप्पलमध्ये एक लहान जीपीएस ट्रॅकर फिट केले. शनिवारी सकाळी पती नेहमीप्रमाणे कामावर गेला, मात्र त्याचे पूर्ण लक्ष मोबाईलमधील लोकेशनवर होते. काही वेळाने त्याला आपल्या घराचे लोकेशन संशयास्पद वाटले, तेव्हा त्याने तातडीने घर गाठले.

घरात घुसताच उडाला गोंधळ

पती जेव्हा अचानक घरी पोहोचला आणि त्याने दरवाजा उघडला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत घरात उपस्थित होती. यानंतर संतापलेल्या पतीने आरडाओरडा सुरू केल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. या गोंधळादरम्यान दोघांमध्ये धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

Uttar Pradesh Crime: लखनौमध्ये संतापजनक घटना; पावसात आसरा घेतलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा

या वादादरम्यान पतीने रागाच्या भरात प्रियकराची परवानाधारक पिस्तूल आणि सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच डायल 112 ची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि सर्वांना पोलीस ठाण्यात घेऊन आली. पोलीस ठाण्यातही उशिरापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या आणि वातावरण तणावपूर्ण होते.

परस्पर संमतीने वादावर पडदा

फुलवारी शरीफ पोलीस ठाण्याचे अध्यक्ष मोहम्मद शहबाज आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पती, पत्नी आणि प्रियकर यांच्यात परस्पर संमतीने समझोता झाला. तिन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध कोणतीही कायदेशीर तक्रार न देण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही बाजूने लेखी तक्रार प्राप्त न झाल्यामुळे पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही आणि उशिरा रात्री सर्वांना सोडून देण्यात आले.

Dharashiv Crime:मध्यरात्रीचा थरार! पत्नीचा कुऱ्हाडीने केली हत्या; मात्र लेकीने पाहिलं आणि…, मुलगा थोडक्यात बचावला

Web Title: Husband tracks wife with gps slipper patna news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • crime news
  • GPS
  • Husband and wife
  • patna

संबंधित बातम्या

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
2

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक
3

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान
4

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.