
लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक
उत्तर प्रदेशमधील सितारापुर जिल्ह्यातील महमूदाबाद परिसरातील या प्रकरणामध्ये शुभम वर्मा, त्याची पत्नी अंजू आणि नितीन नावाच्या तरुणाचं नाव समोर आलं आहे. नितीनचं शुभमच्या घरी आधीपासूनच येणं-जाणं होतं. शुभम त्याला आपला भाऊ मानायचा. त्यामुळे त्यांचे नाते इतके जवळचे झाले की, तो कधीही घरी यायचा तिथेच राहायचा तसेच शुभम आणि नितीन एकत्र बसून जेवायचे पण याच दरम्यान अंजू आणि नितीन यांच्यात जवळीक वाढल्याचे समोर आलं बघता बघता घरातील सामान्य नात्यांचं समीकरण पूर्णपणे बदललं. आता परिस्थिती अशी झाली आहे की, अंजू तिचा पती शुभम आणि बॉयफ्रेंड नितीन या दोघांसोबत एकत्र राहण्यावर ठाम आहे.
सहसा अशा प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये वाद किंवा विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण होते. मात्र, इथे शुभम त्या दोघांची साथ सोडायला तयार नाही. शुभमचं म्हणणं आहे की, त्याला त्याची पत्नी अंजू आणि नितीन या दोघांनाही सोडायचं नाही. गरज पडल्यास तो घर सोडायला तयार आहे, पण दोघांशी नातं तोडण्यास तयार नाही. अंजूदेखील याच निर्णयावर ठाम असून, तिला पती आणि नितीन या दोघांसोबतच राहायचं आहे. कुटुंबाने मात्र या निर्णयाला विरोध केला आहे.
या प्रकरणाबाबत दोन्ही बाजूचे लोक महमूदाबाद पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांसमोर बराच वेळ चर्चा झाली. घटनेची माहिती घेत पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजून सांगत वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक भानु प्रताप सिंह यांनीही प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबाचा विरोध आणि तिघेही आपापल्या निर्णयावर ठाम राहिल्याने सध्या तरी यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.