काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव जी सुष्मिता असं आहे. मेडक जिल्ह्यातील अल्लादुर्ग मंडलातील गडीपेड्डापूर गावात ती कुटुंबीयांसोबत राहत होती. २४ जून रोजी सायंकाळी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. विकाराबाद जिल्ह्यातील मोथकुपल्ली गावची रहिवासी असलेल्या सुश्मिताचे लग्न १८ महिन्यांपूर्वी गडीपेड्डापूर येथील बांगडी विक्रेता जी. अभिलाष याच्यासोबत झाले होते. आत्महत्या केली तेव्हा सुष्मिता ५ महिन्यांची गरोदर होती.
Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ
न जन्मलेल्या बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी
सुष्मिताच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, सुष्मिताचा नवरा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. सुष्मिताची आई जनाबाईंनी आरोप केला की, ‘२३ जून रोजी मी आणि माझा नवरा सुष्मिताच्या डोहाळेजेवणाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी सुष्मिताच्या घरी गेलो होतो. आम्ही तिथे असताना अभिलाषने सोहळ्यावरून वाद घातला आणि न जन्मलेल्या बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी केली. यानंतर समाजातील वडीलधाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि आम्ही घरी परत आलो.
गळफास घेऊन आत्महत्या
त्या अपमानजनक अनुभवानंतर दोन दिवसांनी २५ जूनच्या संध्याकाळी सुष्मिताने गडीपेड्डापूर येथील तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांनी तिच्या आई-वडिलांना ही माहिती दिली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत जनाबाईंनी असाही आरोप केला आहे की, नवरा आणि सासूच्या सततच्या छळामुळे त्यांच्या मुलीचा जीव गेला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Ans: आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव जी. सुष्मिता असे आहे.
Ans: पोलिसांनी सुष्मिताचा पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
Ans: पतीकडून झालेला मानसिक छळ आणि गर्भातील बाळाच्या DNA तपासणीच्या मागणीमुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.






