रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह
वैष्णवी तीन महिन्यांची गर्भवती होती आणि सोशल मीडियावर तिचे मोठे चहा ते होते, सुमारे 50 हजार लोक तिची व्हिडिओ पाहत होते. मंगळवारी 17 मार्च रोजी सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा वैष्णवी ही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली आढळली. तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातांवर चाकूचे अनेक वार करण्यात आले होते.
याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केलाय. व फॉरेन्सिक टीम ने घरातून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले भारतीय दंड संहितेच्या कलम 80 हुंडाबळी आणि खून अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
१० महिन्यापूर्वीच लग्न
वैष्णवी आणि गदम हरीचे लग्न सुमारे दहा महिन्यापूर्वीच झाले होते. ते एकाच जातीचे होते, परंतु मुलाच्या कुटुंबीयांनी या नात्याला मान्यता दिली नाही. यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला होता. सुरुवातीला दोघे तिच्या पतीच्या घरी राहत होते पण वाद वाढल्यानंतर वैष्णवी माहेरी राहायला गेली होती.
घटनेच्या दिवशी झाले होते भांडण
वैष्णवीचा पती गदम हरी (वय 24 ) हा फरार आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की सोमवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले ज्या दरम्यान हरीने हा भीषण गुन्हा केला. वैष्णवी आणि हरी मध्ये काही काळापासून तणाव होता. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, हरी हुंड्यावरून त्यांच्या मुलीचा छळ करत होता. शेजारच्यांनीही दोघांमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणाची माहिती दिली ज्यात घटनेच्या रात्री झालेल्या जोरदार वादाचाही समावेश आहे.
आरोपीचा शोध सुरु
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. त्याने हत्या का केली? असावी अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. पोलीस याचा देखील शोध घेत आहे.
Ans: हैदराबादजवळील जगतियाल जिल्ह्यातील माधापूर गावात घटना घडली.
Ans: पीडितेचा पती गंदम हरी याच्यावर संशय असून तो फरार आहे.
Ans: हुंड्याचा छळ व कौटुंबिक वादामुळे हा प्रकार घडल्याचा संशय आहे






