Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: नग्न अवस्थेत मंदिरात धाव, देवीची मूर्ती उचलली अन् तलावात उडी; महिला इंजिनिअरच्या रहस्यमय मृत्यू!

हैदराबादमधील 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तेजस्विनीच्या मृत्यूने धक्कादायक वळण घेतले आहे. सीसीटीव्हीमध्ये ती नग्न अवस्थेत मंदिरात जाऊन देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी मारताना दिसली. सुरुवातीला आत्महत्या मानलेले प्रकरण आता संशयास्पद बनले असून, बेपत्ता मूर्ती, बँक व्यवहार, राहण्याची जागा आणि इतर सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 19, 2026 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तेजस्विनी नग्न अवस्थेत मंदिरातून देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी मारताना सीसीटीव्हीत कैद झाली.
  • बेपत्ता झालेली देवीची मूर्ती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानून शोधमोहीम सुरू आहे.
  • पोलिसांकडून बँक व्यवहार, कथित मृत्यूपूर्व विधान, राहण्याची जागा आणि इतर सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील 25 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाने तपासाला अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला आत्महत्येचे प्रकरण मानले जात असलेल्या या घटनेत सीसीटीव्ही फुटेजमधून अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आल्यानंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. तरुणीने कथितपणे नग्न अवस्थेत मंदिरात प्रवेश करून देवीची मूर्ती उचलली आणि ती छातीशी धरून तलावात उडी घेतल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या देवीच्या मूर्तीचा शोध सुरू असून, तरुणीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

काय नेमकं प्रकरण?

मृत तरुणीचे नाव तेजस्विनी असे असून ती मूळची आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील रहिवासी होती. ती बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिने नोकरी सोडली होती. घटनेच्या दिवशी तेजस्विनीने तिचे सर्व कपडे काढले आणि नग्न अवस्थेत पीरजादीगुडा येथील एका मंदिरात धावत गेली. तेथे तिने देवी अम्मावरुची मूर्ती उचलली आणि ती छातीशी धरून जवळील तलावाकडे निघाली. त्यानंतर तिने तलावात उडी घेतली. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार मानून पोलिसांनी तपास पूर्ण केला होता. मात्र, मंदिरातील देवीची मूर्ती बेपत्ता झाल्याने तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि त्यात तेजस्विनीची संपूर्ण हालचाल कैद झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी पुन्हा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…

तलावात मूर्तीचा शोध, अनेक प्रश्न अनुत्तरित

या प्रकरणानंतर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या पथकाने तलावात शोधमोहीम सुरू केली असून मूर्ती शोधण्यासाठी बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या मते, बेपत्ता झालेली देवीची मूर्ती या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. पोलिसांनी तेजस्विनीची आई अरुणा यांची चौकशी केली असून तिच्या मृत्यूपूर्वीच्या हालचाली, मोबाईल कॉल रेकॉर्ड, बँक व्यवहार आणि कथित ‘डेथ डिक्लेरेशन’चीही तपासणी सुरू आहे.

महिन्याला एक लाख रुपयांचे भाडे; लॉजच्या कनेक्शनचाही तपास

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तेजस्विनी ज्या इमारतीत राहत होती, तेथे ती दररोज सुमारे ३,५०० रुपये म्हणजेच महिन्याला जवळपास एक लाख रुपये भाडे देत होती. याशिवाय, त्या इमारतीचे वरचे दोन मजले बेकायदेशीरपणे लॉजप्रमाणे चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या लॉजचा आणि तेजस्विनीच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असून, पोलिसांकडून सर्व शक्य बाजूंनी चौकशी केली जात आहे. सध्या या रहस्यमय मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satara News: साताऱ्यात थरार! फॅक्टरीतील जळत्या भट्टीत कामगाराची उडी; आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय होते?

    Ans: तेजस्विनी.

  • Que: पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा कोणता ठरला आहे?

    Ans: देवीची बेपत्ता मूर्ती.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोणत्या आधारांवर सुरू आहे?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज, बँक व्यवहार, मृत्यूपूर्व विधान आणि इतर पुरावे.

Web Title: Hyderabad crime ran naked into a temple picked up the idol of the goddess and jumped into a lakemysterious death of a female engineer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • crime
  • Hyderabad
  • Hyderabad Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.