काय घडलं नेमकं?
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव दुर्गा रोधा प्रधान असे आहे. तो मूळचा झारखंड राज्यातील राजाबासा येथील रहिवासी होता. वाई एमआयडीसीमधील संबंधित कंपनीत तो गेल्या काही काळापासून काम करत होता. दुर्गाची गेल्या काही दिवसांपासून मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितले. याच मानसिक तणावातून किंवा नैराश्यातून त्याने हे भयानक पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वार्तिविला जात आहे.
Nagpur Crime: चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन् पतीचे अनैतिक संबंध; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
आत्महत्येचे व्हिडीओ व्हायरल
या संपूर्ण घटनेच्या आत्महत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी याच कंपनीमध्ये अशीच एक आत्महत्येची घटना घडली असल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे एकाच कंपनीत लागोपाठ घडलेल्या या घटनांबद्दल आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर कंपनी प्रशासनात एकच गोंधळ उडाला आहे.
पोलीस तपास सुरु
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दुर्गा ने आत्महत्या का केली? याचा तपास करत आहे.
खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई; सात जण अटकेत, २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस असल्याची खोटी बतावणी करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर बॅरेकेडिंग लावत वाहनचालकांना अडवून कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ans: सातारा जिल्ह्यातील वाई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत.
Ans: दुर्गा रोधा प्रधान.
Ans: मानसिक तणाव किंवा नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.






