Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

हैदराबाद येथील SVPNPA मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या आयपीएस अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला सहकारी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर ही घटना घडली. सुसाइड नोटमध्ये त्यांनी सर्व आरोप फेटाळत परस्पर संमतीने संबंध असल्याचा दावा केला. प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 22, 2026 | 10:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर उदय कृष्ण रेड्डी यांनी विष प्राशन केल्याचा आरोप.
  • सुसाइड नोटमध्ये रेड्डी यांनी सर्व आरोप नाकारत संमतीने संबंध असल्याचा दावा केला.
  • पोलिसांकडून तक्रार आणि सुसाइड नोट या दोन्हींचा सखोल तपास सुरू.
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत (SVPNPA) प्रशिक्षण घेत असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला सहकारी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने केलेल्या छळाच्या तक्रारीनंतर काही दिवसांतच ही घटना घडल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी अधिकाऱ्याने एक सुसाइड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये महिला अधिकाऱ्याने केलेले आरोप फेटाळत तिच्याविरोधात गंभीर दावे केले आहेत. या प्रकरणाचा सध्या पोलीस सखोल तपास करत असून सुसाइड नोटमुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

काय नेमकं प्रकरण?

उदय कृष्ण रेड्डी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. उदय कृष्ण रेड्डी याने रविवारी संध्याकाळी हैदराबादमधील एका मित्राच्या घरी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती बिघडल्यास त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले असून सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहे. उदय कृष्ण रेड्डीवर काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकारी असलेल्या एका महिला प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने रेड्डीविरोधात पाठलाग करणे, शारीरिक मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि परवानगीशिवाय खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे अशी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे हैदराबाद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यावरून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली.

चिठ्ठीत काय?

जून २०२५ पासून आपण दोघांमध्ये संमतीने प्रेमसंबंध होते. महिला अधिकाऱ्याचे लग्न झाल्यानंतरही ती स्वतःहून माझ्या खोलीत येत होती, असे सांगत त्याने केला आहे. महिला अधिकाऱ्याचे लग्न झाल्यानंतरही ती स्वतःहून माझ्या खोलीत येत होती, ९ जुलै २०२६ रोजी घडलेला प्रसंग उल्लेख केला आहे. त्या रात्री तिने स्वतःहून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे रेड्डी याने नोटमध्ये लिहिले आहे. सर्व पुरावे म्हणून आपण ते संभाषण रेकॉर्ड केले होते आणि त्यातील एक व्हिडीओ तिच्या नवऱ्याला पाठवला होता. असे स्पष्टीकरण देत महिला अधिकाऱ्याने सर्व बाबी फिरवून आपल्यावर खोटे आरोप केल्याचा दावा रेड्डी याने केला आहे. सध्या पोलीस या दोन्ही बाजूंचा सखोल तपास करत आहेत.

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव काय?

    Ans: उदय कृष्ण रेड्डी.

  • Que: रेड्डी यांनी सुसाइड नोटमध्ये काय दावा केला?

    Ans: महिला अधिकाऱ्यासोबत संमतीने संबंध असल्याचा.

  • Que: सध्या या प्रकरणात काय सुरू आहे?

    Ans: पोलिसांचा सखोल तपास.

Web Title: Hyderabad ips officer attempts suicide following allegations by a female cooperative officer suicide note gives the case a new twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • crime
  • Hyderabad
  • Hyderabad Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.