(फोटो सौजन्य: Pinterest)
Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
घरात चार जणांचा मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना म्हैसूर जिल्ह्यातील हुंसर शहरातील न्यू मारुती लेआउट परिसरात घडून आली. मृतांची ओळख ४९ वर्षीय हरीश, त्याची पत्नी निशिता (३६), १४ वर्षीय मुलगी नेक्सा आणि ८ वर्षीय मुलगी रक्षा अशी पटली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी पोहचले. इथे त्यांना पहिल्या मजल्यावरील खोलीत हरीश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याचबरोबर त्याची पत्नी आणि दोन्ही मुली या तळमजल्यावरील एका बेडरुममध्ये बेडवर मृतावस्थेत आढळल्या.
गुदमरुन मृत्यू
पोलिसांनी सांगितले की, पत्नी आणि दोन्ही मुलींच्या चेहऱ्यावर चिकटपट्टी लावण्यात आली होती. प्राथमिक तपासानुसार, तीघींचा मृत्यू गुदमरुन झाला आहे. तथापि, मृत्यूचे खरे कारण मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या पोलिस सर्व पैलूंचा तपास करत आहेत.
पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
सुसाईड नोट
घटनास्थळी पोलिसांनी मृतदेहासोबतच एक सुसाईड नोट देखील जप्त केले आहे. यात सुरुवातीला लिहिले होते की, “मी वरच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळेल,” यात व्यावसायिकाने अनेक गोष्टी लिहल्या होत्या. चिठ्ठीचे शीर्षक “माझ्या अखेरच्या इच्छा” असे ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या चिठ्ठीमध्ये मालमत्ता, कागदपत्रे, लाॅकरची माहिती, चाव्यांचे ठिकाण आणि विशिष्ट व्यक्तींच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करण्यासंबंधीच्या सूचना नमूद करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या एका नोटमध्ये कर्ज आणि आर्थिक बाबींचीही माहिती देण्यात आली होती. सध्या पोलिस पोस्टमार्टम रिपोर्ट आणि हाती लागलेल्या सर्व पुराव्यांच्या आधारावर मृत्यूचे खरे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे.






