वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! (Photo Credit- X)
सव्वादोन कोटींचे पाईप व फिटिंगच्या साहित्याचा केला होता पुरवठा
ही कंपनी टाटा व जिंदाल या कंपनीचे पाईप औद्योगीक क्षेत्रात सप्लाय व विक्री करते. २९ एप्रील २०२५ मध्ये पुणे येथील मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे मालक संचालक राहुल महीमकर व व त्यांची पत्नी प्रिती माहीमकर यांना जिंदाल या कंपनीच्या पाईपची आवश्यक्ता होती.
त्यामुळे दोघे पती-पत्नी हे जयराज पाटील यांच्या कंपनीत आले. त्यामुळे त्यांच्या आर्डर प्रमाणे त्यांच्या कंपनीला डीएमआयसी बिडकीन, पाँडेचेरी, धारवाड, कागल कोल्हापुर, चाकन पुणे, खोपोली या साईडवर पाईप असे एकुण २ कोटी २६ लाख ८२ हजार १९० रुपयाचे पाईप व फिंटीगचे साहीत्य सप्लाय केले. त्यावर त्यांनी जयराज पाटील यांना १ कोटी ३४ लाख ९९ हजार ४०१ रुपये के.पी. सेल्स कॉर्पोरेशनच्या खात्यावर ट्रांन्सफर केले. बाकी रक्कम ९१ लाख ८२ हजार ७८९ रुपये दिले नाही. त्यामुळे जयराज पाटील यांनी राहुल माहीमकर व त्याचे पार्टनर प्रिती माहीमकर यांना कॉल केले.
हे देखील वाचा: अडीच हजारांची लाच घेणं भोवलं; आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले
फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न, पण केली टाळाटाळ
परंतु त्यांनी फोन उचलले नाही. संपर्क झाल्यानंतर त्यांनी कळविले की, मला संबंधिताकडून पैसे मिळाले नाही. त्यांच्याकडून पैसे आले तर मी तुम्हाला देतो. त्यामुळे ज्या साईडवर माल सप्लाय केला, त्यांच्याकडे जयराज पाटील यांनी खात्री केली असता समजले की, मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. चे सचांलक राहुल माहीमकर व प्रिती माहीमकर यांना त्यांचे पैसे मिळाले. परंतु त्यांनी जयराज पाटील यांचे पैसे देले नाही. याप्रकरणी जयराज पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. संचालक राहुल माहीमकर व प्रिती माहीमकर यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या बँकांचे दिले धनादेश
जयराज पाटील यांनी व्यवहाराची रक्कम देण्याबाबत माहीमकरकडे विचारणा केली असता, त्यांनी ऍक्सीस बँकेचे ६ धनादेश सेक्युरीटी म्हणून दिले. मात्र ऍक्सीस बँकेत व्यवहार असक्रीय असल्याने तुम्ही असक्रीय व्यवहाराचे बँकचे चेक का दिले? असे विचारल्यावर माहीमकर यांनी कोटक महींद्रा बँकेचे ६ धनादेश दिले. ते बँकेत वटविण्यासाठी टाकले असता रक्कम पुरेशी नसल्याने चेक अनादरीत झाले. त्यानंतर पुन्हा राहुल माहीमकर यांनी आयसीआयसीआय बँकेचे ६ धानदेश दिले. ते वटविण्यासाठी बँकेत टाकले असता, राहुल माहीमकरच्या खात्यावर रक्कम पुरेशी असतांनासुध्दा माहीमकर याने बँकेत कळविले की, पेमंट थाबवून धनादेश परत करण्यास सांगितले.






