'डिजिटल अरेस्ट' करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा (Photo Credit - AI)
भीती दाखवून घातला ‘डिजिटल’ वेढा
सह्याद्री हिल्स येथे राहणाऱ्या गृहिणीने फिर्याद दिली. त्यानुसार, १६ डिसेंबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांना फोन आला. मोबाइल सेवा बंद होणार असल्याचे तसेच त्यांच्या नावावर बेकायदेशीर जाहिरात व छळवणुकीचे प्रकरणी कसे झाली असल्याची बतावणी करुन कॉल मुंबई क्राईम बँच अधिकाऱ्यांकडे वळवण्यात आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला क्राईम बँच अधिकारी असल्याचे सांगत व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केला. प्रोफाइलवर मुंबई पोलिसांचा लोगो असल्याने फिर्यादी घाबरल्या.
आरोपींनी त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेले बनावट बँक खाते व एटीएम कार्ड दाखवत मनी लॉडिंगचा खोटा आरोप लावला. सायबर गुन्हेगारांनी ईडी कार्यालयाच्या बनावट नोटिसा, अटक वॉरंट तसेच एका आरोपीचे छायाचित्र पाठवले. तुमच्या विरोधात एफआयआर आहे, तपास सुरू आहे, असे सांगून कोणालाही माहिती दिल्यास कुटुंबाला धोका असल्याची धमकी देण्यात आली, यामळे फिर्यादी खुप घाबरल्या.
डिजिटल अरेस्टमध्ये असल्याचे भासवले
तपासाच्या नावाखाली फिर्यादीला सतत व्हिडीओ कॉलवर ठेवण्यात आले. तुम्ही सव्हिलन्सवर आहात, असे सांगत फोन चार्जिंगला लावून कॉल सुरू ठेवण्यास भाग पाडण्यात आले. कोणाशीही संपर्क साधू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली. तसेच याबाबत कोणाला काही सांगू नका अन्यथा तुमच्या घरी धाड टाकून फायरिंग करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली.
टप्याटप्प्याने उकळले पैसे
१७ ते २२ डिसेंबरदरम्यान तपासासाठी पैशांची पडताळणी आवश्यक असल्याचे सांगून गुगल पे, यूपीआय, आणि आरटीजीएसद्वारे विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास भाग पाडले. तसेच एफडी मुदतपूर्व तोडून सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या खात्यावर पैसे पाठवायला लावून एकूण २५ लाख ८७हजार रुपयांची फसवणूक केली.






