Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला दांडक्याने मारहाण; साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न

कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्यांच्याकडील त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 14, 2025 | 06:28 PM
कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला दांडक्याने मारहाण; साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न

कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला दांडक्याने मारहाण; साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्यांच्याकडील त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत कामगार जखमी झाला आहे. याबाबत सलीम सिकंदर शेख (वय ३१, रा. भैरवनाथ मंदिरासमोर, खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी दांडक्याने मारहाण केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शेख एका पेट्रोल पंपावर कामाला आहेत. सोमवारी (१३ जानेवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ते पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी निघाले होते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर परिसरात तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. डोक्यात दांडके बसल्याने ते जखमी झाले. झटापटीत चोरट्यांनी शेख यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला.

शेख यांनी प्रसंगावधान राखून पिशवी घट्ट पकडली. त्यांचा आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. नागरिक जमा झाल्याचे पाहताच चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक शेंडे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?

पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पान टपरी फोडून चोरी

पुणे स्टेशन परिसरात हॉटेलजवळ असलेली पान टपरी अज्ञाताने फोडून सिगारेट पाकीट आणि रोकड असा ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अर्जुन मोहिते याचा तपास करीत आहेत.

Web Title: In katraj thieves beat up a worker at a petrol pump with a stick nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
3

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
4

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.