Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बाबा मला वाचवा”, मृत्यूच्या काही तास आधी केला वडिलांना फोन पण… बिहारमध्ये हुंड्याच्या आगीत जळून निघाली विवाहित महिला

Bihar Crime : बिहारमधील या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, हुंडाबळीची आणखी एक महिला शिकार ठरली आहे. हुंड्यासाठी तिच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले आणि तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2026 | 12:00 PM
"बाबा मला वाचवा", मृत्यूच्या काही तास आधी केला वडिलांना फोन पण... बिहारमध्ये हुंड्याच्या आगीत जळून निघाली विवाहित महिला

"बाबा मला वाचवा", मृत्यूच्या काही तास आधी केला वडिलांना फोन पण... बिहारमध्ये हुंड्याच्या आगीत जळून निघाली विवाहित महिला

Follow Us
Follow Us:
  • विवाहित महिलेवर गंभीर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • कुटुंबीयांनी सासरच्यांवर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे.
  • पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू करून आरोपींवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
हुंडा घेणे कायद्याने गुन्हा असला तरी आजही अनेक खेड्या-पाड्यात हुंडा मागितला जातो आणि दिलाही जातो. हुंडा प्रथेने अनेक महिलांचे आयुष्य उद्धवस्त केले असून बिहारमधून यासंबंधित आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंडा दिला नाही म्हणून विवाहित महिलेला जिंवत असतानाच तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले ज्यात तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुलहा टोली परिसरात घडून आली आहे. महिलेचे शरीराचा जवळपास ९० टक्के भाग जळून गेला ज्यांनंतर तिला बेतिया येथील जीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Maval Crime : अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय?राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कानाडोळा

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी तिने आपल्या कुटुंबियांना फोन करुन तिला वाचवण्याची विनंती केली होती. ओरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक १२, जुलाहा टोली येथे पहाटे सुमारे दीड वाजता, विवाहित महिला खुशबू खातून यांच्या किंकाळ्या ऐकू आल्याने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. महिलेच्या किंकाळ्या ऐकून स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ११२ नंबरवर काॅल करत सदर घटनेची माहिती दिली. स्थानिकांनी असा आरोप केला आहे की, खुशबू खातूनच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर पेट्रोल टाकून, तिला जाळून तिचा जीव घेतला.

Mira Bhayander : पोलिसांसमोर चॉपर काढला अन्….; मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला शिंदे गटाच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान खुशबू खातूनचा रामनगरचे रहिवासी असलेल्या औरंगजेब यांच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच सासरचे आणि माहेरचे यांच्यात हुंड्यावरुन वाद सुरु होता. कुटुंबाच्या माहितीनुसार, लग्नाला दोन वर्षे होऊनही मूलबाळ झालं नाही म्हणून खुशबूचा सासरच्यांकडून छळ केला जात होता. खुशबुचा भाऊ, सुद्दाम याने सांगितले की, घटनेच्या काही तास आधी रात्री खुशबूने त्यांना फोन करुन सासरचे तिला मारण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगितले. तिने फोनवर वडिलांना तिला वाचवण्याचीही विनवणीही केली. याच्या काही वेळानंतरच तिच्या पेट्रोल ओतून तिला मारण्यात आले. कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केला असून न्यायाची मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आता घटनेचा तातडीने तपास सुरु केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा कसून तपास केला जाणार असून आरोपींवर वेळीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

Web Title: In laws burn woman alive over dowry in bihar crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Bihar Crime News
  • crime news
  • Dowry Prevention Act

संबंधित बातम्या

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
2

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर
3

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.