Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेलमधून बाहेर आला अन् कोयत्याने तिघांना तोडला; पुण्यात नेमकं काय घडलं?

वर्षभर कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 21, 2024 | 03:18 PM
जेलमधून बाहेर आला अन् कोयत्याने तिघांना तोडला; पुण्यात नेमकं काय घडलं?

जेलमधून बाहेर आला अन् कोयत्याने तिघांना तोडला; पुण्यात नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई केल्यानंतर वर्षभर कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महेश गजसिंह हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. कोंढवा पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई केली होती. एक महिन्यापुर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आहे. दरम्यान महेश व जखमी यांच्यात शाब्दीक वादावादी झाली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास तक्रारदार व त्यांचे मित्र गप्पा मारत बसले असता आरोपी त्याठिकाणी घातक हत्यारे घेऊन आले. अमित परदेशी याच्या डोक्यात तसेच हनुवटीवर वार करून गंभीर जखमी केले. तर, तक्रारदाराला उलट्या कोयत्याने मारहाण केली. सोहेश याच्यावर देखील आरोपींनी सपासप वार करून गंभीर जखमी केले. नंतर चौघांनी अजय पवार याच्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात बार अँड रेस्टाँरट फोडले, दारूच्या बाटल्यांची चोरी; नेमकं काय घडलाय प्रकार?

विद्यार्थ्याचा गळा चिरला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. दरम्यान गेल्या काहगी तासाखाली शाळेतील वार्षिक समारंभावरुन वादावादी झाल्यानंतर नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर भागातील मांजरी भागतील एका शाळेत ही घटना घडली आहे. याप्रकरणी १४ वर्षीय मुलावर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याघटनेत १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मांजरीतील शाळेत नववीत तक्रारदार मुलगा शिकायला आहे. गुन्हा दाखल झालेला मुलगा त्याच्या वर्गात आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांत वाद झाला होता. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास जखमी मुलगा वर्गात बसलेला होता. तेव्हा आरोपी मुलगा अचानक पाठीमागून आला. त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला.

Web Title: In pune the criminal has beaten three people after coming out of jail nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 03:08 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक
1

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत
2

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत

Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात
3

Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त
4

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.