Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! ४८ तासात ५ खून; ‘या’ भागात घडल्या घटना

शांत पुण्यात गेल्या ४८ तासात खूनाच्या तब्बल पाच घटना घडल्या असून, वानवडी, सिंहगड तसेच वाघोली आणि मध्यरात्री कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2024 | 04:35 PM
पुणे हादरलं! ४८ तासात ५ खून, 'या' भागात घडल्या घटना

पुणे हादरलं! ४८ तासात ५ खून, 'या' भागात घडल्या घटना

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शांत पुण्यात गेल्या ४८ तासात खूनाच्या तब्बल पाच घटना घडल्या असून, वानवडी, सिंहगड तसेच वाघोली आणि मध्यरात्री कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत. वानवडी तसेच सिंहगड परिसरात पुर्ववैमन्यासातून अल्पवयीन मुलांना ठार मारण्यात आले आहे. तर, वाघोलीत दारू पिताना वडिलांना ‘टकल्या’ म्हणल्याच्या रागातून १६ वर्षीय मुलाने एका ४६ वर्षीय व्यक्तीचा खून केला आहे. तसेच, कोंढव्यात तीन हजारांच्या व्यवहारातून एकाचा खून केला गेला आहे. अवघ्या ४८ तासात ५ खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कोंढवा परिसरात बुधवारी मध्यरात्री तीन हजारांच्या आर्थिक व्यवहारातून ताहिर उर्फ बबलू शेगडीवाला (वय ५९) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास चेत्री (वय ४७) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ताहिर व विकास ओळखीतील आहेत. दोघेही मिळेल ती कामे करतात. दरम्यान, तीन हजार रुपयांवरून त्यांच्यात रात्री पुन्हा वाद झाला होता. वादानंतर रागाच्या भरात डोक्यात दगड घालून ताहिर याचा खून केला.

चौथ्या खूनाची घटना वाघोली परिसरात घडली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दारूच्या नशेत असताना एकाने तुझा बाप टकल्या आहे असे म्हंटल्यानंतर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने मारहाण केली. नंतर भला मोठा दगड उचलून आधी पाठित आणि नंतर छातीवर टाकून खून केला. राजू लोहार (वय ४६) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना वाघोलीतील दरेकर वस्तीत घडली आहे.

त्यापुर्वी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नर्हे परिसरात गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून माजी सरपंच व इतरांनी एका १८ वर्षीय तरुणाचा लाडकी बांबूने बेदम मारहाण करून खून केला. सुरूवातीला मारहाणीचा गुन्हा नोंद झाला. नंतर तो तरुण मृत पावल्यानंतर याप्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून या परिसरात मोठी खळबळ देखील माजली होती. प्रकरणच मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला होता. पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर गुन्हा नोंदवून तीन जणांना अटक केली.

हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; नवी पेठेतील बंगला फोडला अन्…

वानवडी परिसरात पुर्ववैमन्यासातून १७ वर्षीय मुलगा कॉलेजला जात असताना दोघांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करून भल्यासकाळी खून केल्याची घटना घडली होती. वानवडीतील खूनानंतर मंगळवारी मध्यरात्री सिंहगड रोड परिसरात तिघांनी गणेशोत्सवात झालेल्या वादातून एका १६ वर्षीय मुलाचा सपासप वार करून खून केला होता. गेल्या दोन दिवसात शहरात खुनाचे पाच प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ह्या खूनाचे सत्र गुरूवारी देखील सुरूच असल्याचे दिसत आहे.

Web Title: In the peaceful city of pune 5 murders have taken place in 48 hours nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 04:35 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
2

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
4

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.