Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

पुण्यात महिलांवरील अत्याचार, साखळीचोरी, वाहनचोरी आणि नागरिकांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या गुन्ह्यांनी मात्र पोलिसांची डोकेदुखी कायम ठेवली आहे. खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट दिसून येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2026 | 12:11 PM
पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित पुण्यातील गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून, संघटित गुन्हेगारीविरूद्ध पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षांत ‘ऑपरेशन कोयता’, मोक्का, तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाया, सीसीटीव्ही विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून प्रभावी मोहीम उघडली असली तरी महिलांवरील अत्याचार, साखळीचोरी, वाहनचोरी आणि नागरिकांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या गुन्ह्यांनी मात्र पोलिसांची डोकेदुखी कायम ठेवली आहे. दुसरीकडे खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट दिसून येत आहे.

 

पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांसोबतच ड्रग्ज फ्री सिटी तसेच संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रयत्न केले आहेत. या घटनांकडे गांर्भियाने लक्ष केंद्रीत करून गेल्या काही महिन्यांमध्ये सराईतांवर वचक बसविण्यात काही प्रमाणात यश मिळविले आहे. असे असतानाही शहरात टोळी युद्धातून खूनाच्या घटना घडल्या तसेच दोन प्रमुख टोळक्यांकडून खूनाचे प्रयत्न झाले. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला लगाम लावण्यासाठी पुणे पोलिसांनी मकोका सारखी कारवाई केली.

दुसरीकडे मात्र, सर्व सामान्यांच्या दैनंदिन जीवनातील स्ट्रीट क्राईमचा आलेख वाढतच चालला आहे. समाधानाची बाब म्हणजे मे २०२६ अखेर शहरात ४६ खुनांचे गुन्हे नोंदविले आहेत. २०२५ मध्ये वर्षभरात ८१, तर २०२४ मध्ये ८९ खुनांची नोंद झाली होती. त्याचप्रमाणे खुनाच्या प्रयत्नांच्या ५२ घटना मे अखेर समोर आल्या असून, मागील दोन वर्षांत हा आकडा अनुक्रमे १६२ आणि १७१ इतका होता. वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतील आकडे पाहता गंभीर गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळल्याचे चित्र आहे. मात्र, या घटनांमागे जुन्या वैमनस्यातून होणारे हल्ले, टोळीयुद्ध, आर्थिक व्यवहारातील वाद आणि क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हिंसक प्रतिक्रिया हेच प्रमुख कारण असल्याचे पोलिस तपासातून सातत्याने समोर येत आहे. दुसरीकडे, दुखापतीच्या ६२३ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. किरकोळ कारणांसह पुर्ववैमन्यास्य तसेच तत्कालीक कारण यामुळे या घटना घडल्याचे प्रमुख कारण आहे.

महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ

महिलांच्या अत्याचाराची आकडेवारी पाहता मे २०२६ अखेर २११ बलात्कार, तर ३७९ विनयभंगाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांतील आकडेवारीशी तुलना करता वर्ष संपण्यापूर्वीच हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नसरापूर प्रकरणानंतर पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, या घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्ती, सोशल मीडियावरुन ओळख तसेच लग्नाचे आमिष अशा घटना सर्वाधिक आहेत.

हे सुद्धा वाचा : मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर; आयुक्तांकडून तातडीने कार्यवाहीचे आदेश

ऐवजावर डल्लांच्या घटना मोठ्या प्रमाणात

सर्वसामान्य नागरिकांच्या ऐवजावरील डल्ला मारण्याच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. घरफोड्या, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी तसेच मोबाईल चोरी अशा घटना सातत्याने सुरू आहेत. धार्मिक सोहळे, गर्दीचे ठिकाण, बसथांबे व एकट्या नागरिकांना हेरून सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनात आहेत. तर, वाहन चोरी नित्याची झाली आहे. वर्षागणिक ही संख्या वाढत आहे. पोलिसांकडून या चोरट्यांचा माग काढण्यात येत असला तरी या टोळ्यांचा धुमाकूळ थांबत नसल्याचे चित्र आहे.

गुन्हेगारीची आकडेवारी

गुन्हा २०२६ २०२५ २०२४
खून ४६ ८१ ८९
खुनाचा प्रयत्न ५२ १६२ १७१
दुखापत ६२३ १५५१ १५०१
चैन स्नॅचिंग ३८ १२९ १०३
बलात्कार २११ ४९९ ४९४
विनयभंग ३७९ ९१३ ८४१

Web Title: Incidents of atrocities against women and theft have increased in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?
1

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल
3

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु
4

सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.