'ती', सुरक्षित नाही! सव्वा महिन्यात सव्वाशे विनयभंग अन् अत्याचाराच्या तब्बल...
पुणे/अक्षय फाटक : स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचारप्रकरणाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण, त्या वाईट प्रवृत्तीने तरुणीला प्रथम ‘ताई’ अशी आपलेपणाने हाक मारून तिच्या मनात सुरक्षितता निर्माण केली अन् तिच्याशी बोलणे वाढविले. तिचा विश्वास मिळवून तिला त्या बसपर्यंत नेल्याचे तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून दिसत आहे. ही धक्कादायक घटनेसोबतच सुसंस्कृत शहराचा महिला सुरक्षेबाबत आढावा घेतला असता “ती” सुरक्षित नाही असेच दिसत असून, गेल्या सव्वा महिन्यात विनयभंगाच्या १२५ घटना घडलेल्या आहेत. तर अत्याचाराराचे ५६ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे.
विनयभंग तसेच अत्याचाराच्या घटनेतील आरोपी हे एक तर ओळखीचे किंवा नात्यातील असल्याचे देखील पोलिसांच्या माहितीवरून समजते. त्यामुळे आपलेपणाची भावना निर्माण करून तिचं सोशष केलं जात असल्याचे पुन्हा समोर आलं आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटना वर्षाला वाढत असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसते. गेल्या वर्षी बोपदेव घाटप्रकरण गाजले. मित्रासोबत फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर मध्यरात्री तिघांनी सामूहिक अत्याचार केला. हेप्रकरण देखील काही तासांनी उघडकीस आले. तोपर्यंत आरोपी पसार देखील झालेले होते. बोपदेव घाटाच्या परिसरात मोबाईल, सीसीटीव्ही किंवा लाईट असा काहीच प्रकार नव्हता. त्यानंतरही पुणे पोलिसांनी अथक प्रयत्न केले. तब्बल दहा दिवसानंतर याप्रकरणात पोलिसांना दोन आरोपींना पकडण्यात यश आले होते. अद्यापही यातील एक आरोपी फरारच आहे. पोलिसांना तो सापडलेला नाही. पोलीस त्याचा माग घेत आहेत. तीनही आरोपी सराईत गुन्हेगार होते. लुटमारीच्या उद्देशाने रात्री-अपरात्री फिरत असत. तेव्हाच त्यांना बोपदेव घाटात ही तरुणी व तिचा मित्र दिसला व त्यांच्यातील शैतान जागा झाला. त्यांनी आळीपाळीने अत्याचार केला होता.
स्वारगेटमधील प्रकरण देखील शैतानीच आहे, आरोपी एकच आहे. पण त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. नंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे पुण्यातील तरुणी, महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात छेडछाड तसेच विनयभंग आणि अत्याचारासारख्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामुळे ती सुरक्षित नाहीच, असे म्हणावे लागत आहे.
पालक वर्ग चिंतेत..!
बोपदेव घाट तसेच स्वारगेटमधील तरुणी बाहेर शहरातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या होत्या. अशा असंख्य तरुणी नोकरी, शिक्षणानिमित्ताने पुण्यात राहतात. त्यांच्याबाबत घडत असलेल्या अशा घटनांमुळे पालक वर्ग चिंतेत आहे. पुणे आयटी हब व शिक्षणाची विद्यानगरी आहे, पण अशा घटनांमुळे ती बदनाम होताना दिसत आहे. अत्याचार, छेडछाड तसेच विनयभंग अशा घटनांसोबतच त्यांना लुटले जाते. चाकू दाखवून त्यांच्याकडील ऐवज काढून घेतला जातो. त्यामुळे त्यांच्या मनावर एक खोलवरचा परिणाम होतो. अशा घटनांमुळे पालकांना आपल्या पाल्यांना पुण्यात एकटे पाठवावे का, असा प्रश्न पडत आहे.
स्वारगेट बस स्थानकच असुरक्षित
स्वारगेट बस स्थानक मुळात सुरक्षित नाही, असेच म्हणावे लागेल. इतर बस स्थानक तेथेही दुरगंधी तसेच मध्यरात्री असुरक्षित भावना असेच चित्र त्याठिकाणी फिरल्यानंतर पाहिला मिळते. बस मुक्कामी असल्यानंतर चालक कुठेतरी आडबाजूला लावून गेलेले असतात. त्यामुळे त्या बसमध्ये काय-काय घडते असा प्रश्नच आहे. कारण, काही बसची पाहणी केल्यानंतर त्याही ठिकाणी संशय यावे अशीच स्थिती पाहायलाला मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी २४ पोलीस सोबतच प्रकाश योजना देखील करण्याची गरज आहे.
हा माझ्याशी वाईट वागला!
तरुणीसोबत घडलेल्या घटनेनंतर ती प्रचंड घाबरलेली होती. ती बसमधून उतरताच तिने एका व्यक्तीला हा माझ्याशी वाईट वागला असे सांगितले होते. तेव्हा त्या व्यक्तीने अश्या प्रकारची वाईट लोक असतात. तू आपलं घरी निघून जा असे सांगितले. तेव्हाच त्या व्यक्तीने आपूलकीने तिच्याकडे विचारपूस केली असती किंवा त्या तरुणीने त्यांना घटनेबाबत सांगितले असते तर आरोपीला जागीच पकडण्यात यश मिळाले असते.
बसस्थानकात गर्दी होती!
स्वारगेट बसस्थानकात कायमच गर्दी असते. दिवसा तर वाहने लावण्यासाठी किंवा एकाचठिकाणी बराच वेळा उभा देखील राहू शकणार अशी स्थिती असते. रात्रीही उशिरापर्यंत अशीच काहीशी स्थिती असते. प्रवाशी मोठ्या संख्येने असतात. मध्यरात्रीनंतर मात्र थोडीफार गर्दी कमी होते. पण, प्रवाशी असतात. पुर्ण स्थानक निर्जन आहे, असे होत नाही. घटनेच्या वेळीही बऱ्यापैकी गर्दी होती. तरुणीने आरडाओरडा केला असता किंवा बसमधून बाहेर पडल्यानंतरही तिने कोणाला याबाबत सांगितले असते तर आरोपीला पकडण्यात यश आले असते. कारण, तरुणी बसमधून बाहेर पडल्यानंतर तिच्या आजूबाजूला प्रवाशी महिला ज्या बसची वाट पाहत आहेत, त्या सीसीटीव्हीत दिसत आहेत.
सीसीटीव्हीत आरोपी कैद
स्वारगेट बस स्थानकात सीसीटीव्ही आहेत. परंतु, म्हणावा तसा प्रकाश त्याठिकाणी नाही. खरतर पुण्यासारख्या शहरातील प्रमुखपैकी एक हे बसस्थानक आहे. मात्र, रात्री बऱ्याच प्रमाणात अंधारमयच असतो. पोलिसांनी घटनेनंतर सीसीटीव्ही तपासले आहेत. त्याठिकाणी संबंधित बसमध्ये जाताना व पुन्हा उतरत असताना आरोपी व पिडीत तरुणी कैद झालेली आहे. त्यानूसारच पोलिसांनी आरोपीची ओळख पटविली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावर डॉगस्कॉडला पाचारण केले होते. त्यानूसार या आरोपीचा माग काढला जात आहे.