पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडेची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दत्त गाडेला जन्मठेप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वारगेट प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुढील १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, एसटी बसस्थानके महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी वसंत माेरे यांना इशारा दिला.
काही महिन्यापूर्वी पुणे पोलिसांच्या हद्दीतील बोपदेव घाटामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. एकंदरीतच वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुणे आता महिलांसाठी सुरक्षित राहिले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे शहराचा महिला सुरक्षेबाबत आढावा घेतला असता "ती" सुरक्षित नाही असेच दिसत असून, गेल्या सव्वा महिन्यात विनयभंगाच्या १२५ घटना घडलेल्या आहेत. तर अत्याचाराराचे ५६ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.
स्वारगेट बसस्थानकात ताई म्हणून तिला आपलेसे करून तरुणीवर अत्याचार करणारा नराधम बसस्थानकाच्या आवारात तब्बल दोन तास घुटमळत सावध शोधत होता, अशी माहिती समोर आली आहे.