
crime (फोटो सौजन्य: social media)
छापा टाकण्यामागचं कारण काय?
रामी हॉटेल ग्रुप हा भारतासोबत बहरीन, दुबई, ओमान यांसारख्या देशांमध्ये कार्यरत असलेला एक आंतरराष्ट्रीय हॉटेल चेन आहे. या ग्रुपच्या मालकीची एकूण 52 हॉटेल्स विविध देशांमध्ये आहेत. सध्या मुंबईतील दादर परिसरातील रामी हॉटेलच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आयकर विभागाच्या टीमने पहाटे अचानक हजेरी लावत या हॉटेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले.
प्राथमिक माहितीनुसार, करचोरी प्रकरणात आयकर विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. सध्या या तपासातून कोणती नवी माहिती समोर येते आणि ग्रुपवर पुढील कोणती कारवाई केली जाईल, हे महत्वाचे ठरणार आहे.
पूर्वीही झाले आहेत छापे
2012 मध्ये, खार येथील रामी गेस्टलाइन हॉटेलच्या ‘मॅडनेस’ डिस्कोथेकवर पोलिसांनी छापा टाकला होता. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरू ठेवण्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. या छाप्यात वेश्याव्यवसाय रॅकेट उघडकीस आलं आणि 10 कर्मचाऱ्यांना अटक तसेच 16 मुलींची सुटका करण्यात आली होती.
2019 मध्ये, दादर पूर्व येथील रामी गेस्टलाइन हॉटेलवर माटुंगा पोलिसांनी छापा टाकून क्रिकेट बेटिंग रॅकेट bust केलं होतं. यात चार जणांना अटक झाली होती आणि त्यात पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश होता.
1985 मध्ये ग्रुपची स्थापना
रामी हॉटेल ग्रुपची स्थापना 1985 मध्ये राज शेट्टी यांनी केली. वयाच्या 18व्या वर्षी दुबईला गेलेल्या राज शेट्टींनी मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर हा ग्रुप उभा केला. त्यांनी फोर्ब्ज मिडल ईस्टच्या टॉप 100 भारतीय लीडर्समध्येही स्थान मिळवलं आहे.
Pune Crime: धक्कादायक!अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या; पुण्यातील प्रकरण
Ans: प्राथमिक माहितीनुसार, करचोरीच्या संशयावरून 30+ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
Ans: मुंबईतील दादर परिसरातील रामी हॉटेल तसेच ग्रुपची कार्यालयं, आस्थापनं आणि पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी.
Ans: राज शेट्टी—2015 मध्ये फोर्ब्ज मिडल ईस्टच्या टॉप 100 भारतीय लीडर्समध्ये नाव.