Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

Crime News Sangli: सांगलीच्या आटपाडीत ८३ वर्षीय वृद्ध महिलेला लुटून जिवंत पेटवून देणाऱ्या नराधम आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अटक केली आहे. कौटुंबिक वादातून नातीच्या पतीनेच हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 09, 2026 | 06:15 PM
सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले

सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले

Follow Us
Follow Us:
  • सांगली हादरली!
  • पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले
  • कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
सांगली : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने लुटून तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याच्या अत्यंत गंभीर गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) लावत आरोपीला अटक केली आहे. राजेश दिलीप गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणाची संपूर्ण माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील उपस्थित होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता शेटफळे (ता. आटपाडी) येथील मालन मारुती जाधव (वय ८३) या लघवीसाठी बाहेर जाऊन परत घरात येत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. आरोपीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले, हात पिरगळला, छातीत लाथा मारून अंगावरील सुमारे १४ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३० भार वजनाचे चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून काडीपेटीने पेटवून दिले.

गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना प्रथम आटपाडी ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना ३ जुलै २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत फिर्यादी विठ्ठल मारुती जाधव यांच्या तक्रारीवरून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासातील आव्हान आणि उकल

घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. जखमी महिला बेशुद्ध असल्याने त्यांचा जबाबही नोंदवता आला नव्हता. त्यामुळे तपासास मोठे आव्हान निर्माण झाले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट

त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विविध अंगांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित राजेश दिलीप गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कौटुंबिक वादातून गुन्हा

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मयत मालन जाधव यांच्या नावावर बलवडी व शेटफळे येथे शेती होती. त्यांनी काही जमीन नातू प्रवीण जाधव यांच्या नावावर केल्याने कुटुंबात नाराजी होती. आरोपी हा त्यांच्या नातीचा पती असून, वृद्ध महिला घरी एकट्याच राहत असल्याची संधी साधून त्याने चोरीचा कट रचला. चोरीदरम्यान महिलेने प्रतिकार केल्याने त्याने त्यांना पेटवून दिल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस निरीक्षक संतोष पवार पुढील तपास करत आहेत.

कारवाईत सहभागी अधिकारी

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

Web Title: Sangli lcb arrests granddaughters husband for burning alive elderly woman in atpadi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…
1

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…

Sangli teachers protest : आम्हाला मानसिक त्रास देऊ नका, मुलांना शिकवू द्या!
2

Sangli teachers protest : आम्हाला मानसिक त्रास देऊ नका, मुलांना शिकवू द्या!

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
3

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
4

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.