
crime (फोटो सौजन्य: social media)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरयेथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतिमंद विध्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांवर बेदम मारहाण करण्यात करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत एक गतिमंद मुलाचे हात पाठीमागे बांधलेले दिसत आहे. तसेच शिपाई त्याला ही मारहाण करत आहेत. ही घटना मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार घडला आहे.
नेमकं काय प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांवर बेदम मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा व्हडिओ देखील समोर आला आहे, व्हिडिओत एक गतिमंद मुलाचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. तसेच शिपाई दीपक इंगळे याने बेदम मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. या मुलांना आपल्या वेदना देखील सांगता येत नाही. या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाणाच नाही तर या विद्यालयात इतर विद्यार्थ्यांनाही अत्याचाराला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण करत आहेत.
गंभीर आरोप
या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान हा प्रकार समोर कसा आला आणि याबाबत सर्वात आधी प्रशासनाकडे तक्रार करणारे प्रतिम घंगाळे यांनी विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिव्यांग आयुक्तांना हा व्हिडीओ पाठवला, मग सगळी सूत्र हलली. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संचालक काय करत होते?
या प्रकरणी दिव्यांग आयुक्तांलयाकडून 28 सप्टेंबरला चौकशीचे आदेश दिले आहे. याची कुणकुण लागताच संस्थाचालक जागे झाले आणि स्वतःहून 30 तारखेला चिखलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मग प्रश्न हा पडतो की एवढ्या दिवस संस्थाचालक काय करत होते.