लुटेरी नवरीचा धुमाकूळ! अनेक तरुणांना गंडा घालून होती फरार (Photo Credit - X)
UP fraud Case: पती-पत्नीचे नाते हे प्रेम आणि विश्वासावर आधारलेले असते, पण याच नात्याच्या नावाखाली विश्वासघात आणि फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे, जिथे पोलिसांनी एका ‘लुटेरी नवरीला’ तिच्या साथीदारासह अटक केली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पटवाई पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. २८ ऑक्टोबर रोजी याच भागातील एका तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तरुणाच्या कुटुंबाने एका युवतीसोबत त्याचे लग्न निश्चित केले होते. अनेक विधी झाले, तसेच ‘गोद भराई’चा कार्यक्रमही अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, लग्न आणि खर्चाच्या नावाखाली तरुणाकडून १ लाख ७७ हजार रुपये घेण्यात आले. पैसे घेतल्यानंतर काही दिवसांतच या मुलीच्या कुटुंबीयांशी तरुणाचा संपर्क तुटला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली! अहिल्यानगरच्या अभियंत्याला घातला 9 लाखांचा गंडा
या तक्रारीनंतर पोलिसांनी युवतीसह एकूण तीन जणांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र, अनेक महिने उलटूनही आरोपींचा कोणताही सुगावा लागत नव्हता. खेरीस, एसएचओ (SHO) पुष्कर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मोठे यश मिळाले. पोलिसांनी फसवणूक करणारी मुख्य आरोपी शिवन्या नावाच्या मुलीला आणि तिचा साथीदार नितीन उर्फ अनिकेत याला अटक केली आहे. अटक केलेले आरोपी संभल जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी या अटकेची माहिती देताना सांगितले की, “पटवाई पोलीस स्टेशन हद्दीतील एका पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला. ‘लुटेरी नवरी’ बनून ठगी करणाऱ्या युवतीला आणि तिच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.” या आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटनांना अंजाम दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.






