Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीजग्राहकांसाठी दिलासा! ‘टीओडी मीटर’मुळे ७५ लाखांची बचत; संभाजीनगर परिमंडळातील घरगुती ग्राहकांचा फायदा

टीओडी मीटर बसवलेल्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १ लाख ८७ हजार घरगुती ग्राहकांना गेल्या चार महिन्यांत ७५ लाख रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 02, 2025 | 03:03 PM
वीजग्राहकांसाठी दिलासा! 'टीओडी मीटर'मुळे ७५ लाखांची बचत (Photo Credit - X)

वीजग्राहकांसाठी दिलासा! 'टीओडी मीटर'मुळे ७५ लाखांची बचत (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • महावितरणकडून मोफत मीटर बसवण्याचे काम सुरू
  • घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट १ रुपयांपर्यंत सवलत मिळणार
  • १ लाख ८७ हजार मीटर लावल्याने लाभ

छत्रपती संभाजीनगर: काही घटकांकडून विरोध होत असला तरी अनेक वीजग्राहक टिओडी (टाइम ऑफ डे) वीजमीटरला पसंती देत आहेत. टीओडी मीटर बसवलेल्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १ लाख ८७ हजार घरगुती ग्राहकांना गेल्या चार महिन्यांत ७५ लाख रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे. त्यामुळे मीटर बसवण्याकामी ग्राहकांनी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

दिवसा वीजवापर केल्यास मोठी सवलत

१ जुलै २०२५ पासून महावितरणच्या स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर टीओडी सवलत लागू झाली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरु झाला आहे. विशेष म्हणजे, महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

१ लाख ८७ हजार मीटर लावल्याने लाभ

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टीओडीनुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे तसेच २०२९-३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.

Sillod Solar Energy: सरकारी इमारती उजळणार ‘सौर ऊर्जेने’! सिल्लोड तालुक्यात ४०% वीज बचत करण्याचे उद्दिष्ट

अशी मिळाली आर्थिक सवलत

प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर परिमंडलात १ लाख ८७ हजार ७८ घरगुती ग्राहकांना वीजबिलात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत ७५ लाख २० हजार ४३७ रुपयेांची टीओडी सवलत मिळाली आहे.

  • छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ५१ हजार ४९५ ग्राहकांना २९ लाख ९९ हजार ८२२ रुपये,
  • छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील ९३ हजार ६३२ ग्राहकांना २९ लाख ७९ हजार १२६ रुपये,
  • जा लना मंडलातील ४१ हजार ९५१ ग्राहकांना १५ लाख ४१ हजार ४८९ रुपये सवलत मिळाली आहे.

वीजवापरावर ग्राहकांचे थेट नियंत्रण

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. त्यामुळे अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

Vaijapur: साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय! वैजापूर बसस्थानकातील घटनेने दिला संदेश

Web Title: Tod meter saves rs 75 lakhs benefits domestic consumers in sambhajinagar circle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरलं! मतिमंद विद्यार्थ्यांच्या विद्यालयात लहान मुलांवर अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल
1

छत्रपती संभाजीनगर हादरलं! मतिमंद विद्यार्थ्यांच्या विद्यालयात लहान मुलांवर अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Sillod Solar Energy: सरकारी इमारती उजळणार ‘सौर ऊर्जेने’! सिल्लोड तालुक्यात ४०% वीज बचत करण्याचे उद्दिष्ट
2

Sillod Solar Energy: सरकारी इमारती उजळणार ‘सौर ऊर्जेने’! सिल्लोड तालुक्यात ४०% वीज बचत करण्याचे उद्दिष्ट

रिक्षाच्या धडकेत दोनजण जखमी; दुचाकीवरील एकाच्या पायाचे हाड मोडले तर दुसऱ्याचे…
3

रिक्षाच्या धडकेत दोनजण जखमी; दुचाकीवरील एकाच्या पायाचे हाड मोडले तर दुसऱ्याचे…

Hotel Rating Fraud: ‘हॉटेल रेटिंग’च्या जाळ्यात व्यावसायिक युवती अडकली; एका क्लिकवर दीड लाख रुपये साफ!
4

Hotel Rating Fraud: ‘हॉटेल रेटिंग’च्या जाळ्यात व्यावसायिक युवती अडकली; एका क्लिकवर दीड लाख रुपये साफ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.