Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder Case News: कोयता आणि चाकुने वार करत तरुणाचा संपवला जीवनप्रवास; ईश्वरपूरमधील हत्येने परिसरात खळबळ!

Murder Case News: सांगलीच्या ईश्वरपुरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. कपड्याच्या दुकानातील वाद आणि जुन्या वैमनस्यातून दोन जणांनी ३१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने शहरात दहशत पसरली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 02, 2026 | 10:41 AM
Murder Case News: कोयता आणि चाकुने वार करत तरुणाचा संपवला जीवनप्रवास; ईश्वरपूरमधील हत्येने परिसरात खळबळ!

Murder Case News: कोयता आणि चाकुने वार करत तरुणाचा संपवला जीवनप्रवास; ईश्वरपूरमधील हत्येने परिसरात खळबळ!

Follow Us
Follow Us:
  • दुकानातील वाद अन् लग्न मोडल्याच्या रागातून ३१ वर्षीय तरुणाची ईश्वरपुरात हत्या
  • कामेरी नाक्यावर आरोपींनी डोक्यात व छातीवर केले वार
  • हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून ईश्वरपूर पोलीसांचा तपास सुरू
Murder Case News: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि हत्येची भीषण घटना समोर आली आहे. कपड्याच्या दुकानात झालेला वाद आणि पूर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघा नराधमांनी धारदार शस्त्रांनी वार करून ३१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला आहे. रविवारी (ता. १) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कामेरी नाका परिसरात हा थरारक प्रकार घडला असून, या घटनेमुळे ईश्वरपूरसह आंबेडकरनगर परिसरात एकच तणाव व खळबळ उडाली आहे.

कपड्याच्या दुकानातील वाद अन् टोकाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सूरज महादेव कांबळे (वय ३१, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी साहिल अनिल कांबळे (वय २७) आणि अंकित मुकुंद कांबळे (वय ३०, दोघेही रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) यांच्याविरोधात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आप्पासो सिद्धनाथ कांबळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानात आरोपी आणि सूरज यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. या दुकानातील वादासह पूर्वी लग्न मोडल्याच्या जुन्या कारणावरून संशयित आरोपींच्या मनात राग होता.

कामेरी नाक्यावर कोयत्याने आणि चाकुने वार

रविवार आणि रात्रीची वेळ असल्याने परिसरात वर्दळ कमी होती. रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास कामेरी नाका येथील बालाजी प्लायवुड अँड हार्डवेअरसमोर आरोपींनी सूरज कांबळे याला गाठले. पूर्ववैर आणि रागाच्या भरात आरोपींनी सूरजवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने आणि कोयत्याने बेछूट वार केले. सूरजच्या डोक्यात व छातीवर गंभीर वार झाल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

Web Title: Ishwarpur news 31 year old boy murdered sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Crime in Sangli
  • murder case news
  • Murder News

संबंधित बातम्या

Washim Murder Case News: “आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब…” सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!
1

Washim Murder Case News: “आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब…” सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!

Husband Murder News: “दारू पाजली अन् दोरीने गळा आवळला…” अपघाताचा बनाव रचणाऱ्या कातील पत्नीसह दोन्ही प्रियकरांना बेड्या!
2

Husband Murder News: “दारू पाजली अन् दोरीने गळा आवळला…” अपघाताचा बनाव रचणाऱ्या कातील पत्नीसह दोन्ही प्रियकरांना बेड्या!

Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी
3

Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी

Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या
4

Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.