Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : मेट्रोचे अडीच लाखांचे बांधकाम साहित्य चोरले; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे २ लाख ६० हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2025 | 01:28 PM
Pune Crime : मेट्रोचे अडीच लाखांचे बांधकाम साहित्य चोरले; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Crime : मेट्रोचे अडीच लाखांचे बांधकाम साहित्य चोरले; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आहे. शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे २ लाख ६० हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याबाबत रितेश प्रधान (वय २३, रा. जगताप नगर, थेरगाव) यांनी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रधान हे मेट्रो कंपनीत सिक्युरिटी सुपरवाइजर म्हणून काम करतात. पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू असताना चोरट्यांनी कामगार पुतळा भागातून अडीच लाखांचे बांधकाम साहित्य चोरून नेले. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. सहायक निरीक्षक राजकुमार केंद्रे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही मेट्रो मर्गिकेवरील साहित्य चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शिवाजीनगर, चतुशृंगी तसेच खडकीत अशा घटना घडल्या आहेत. आतापर्यंत चोरट्यांनी मेट्रो मर्गिकेच्या कामाच्या ठिकाणावरून लाखोंचे साहित्य चोरून नेले आहे. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटना आणि येथील कमकुवत सुरक्षा व्यवस्था देखील याला कारण ठरत आहे.

रविवार पेठेतील वस्त्रदालनात चोरी

रविवार पेठेतील कापडगंज परिसरात मोठे कापड दुकान आहे. हे दुकान देखील चोरट्यांनी फोडून १ लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत गोविंद राजाराम मुंदडा (वय ६५, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंदडा यांचे कापडगंज परिसरात साडी विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद असताना चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरुन पोबारा केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.

पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?

पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: It has been revealed that thieves have stolen metro material in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Metro Station
  • Pune Crime
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ
1

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
2

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
3

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
4

पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.