Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक; तब्बल ३१ लाखांना घातला गंडा

ऑनलाईन टास्कच्या आमिषाने महिलेची सायबर चोरट्यांनी ३१ लाख ६५ हजार रुपांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 04, 2025 | 05:57 PM
सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक; तब्बल ३१ लाखांना घातला गंडा

सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक; तब्बल ३१ लाखांना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ऑनलाईन टास्कच्या आमिषाने महिलेची सायबर चोरट्यांनी ३१ लाख ६५ हजार रुपांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विमानतळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार विमाननगर भागात राहतात. गेल्या वर्षी जून महिन्यात महिलेला चोरट्यांनी मॅसेज पाठवून त्याद्वारे ऑनलाईन टास्कची माहिती दिली होती. घरबसल्या कामाची संधी असे आमिष दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी एक काम दिले. या कामाचे पैसेही दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. नंतर मात्र ऑनलाइन टास्क या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगत जाळ्यात ओढले. यानंतर महिलेला वेळोवेळी बँक खात्यात ३१ लाख ६५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी परतावा दिला नाही. महिलेने रक्कम परत करण्यास मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे तपास करत आहेत.

कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा

कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक

महाराष्ट्रातील मुलांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन लष्करात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी जवानावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि वन गार्डन पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. नितीन बालाजी सुर्यवंशी (रा.मु. पो. हेळंब, तालुका देवणी, जिल्हा लातुर) असे बोगस जवानांचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय 23, रा. नागराळ, तालुका – मुखेड, जिल्हा नांदेड गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2024 रोजी ते आज रोजी पर्यंत सदर्न कमांड कैंटीन व सब एरीया कैंटीन कॅप परिसर येथे घडला आहे. यामध्ये फिर्यादीची 1 लाख 75 हजारांची फसवणूक करण्यात आली.

Web Title: It has come to light that the woman was cheated by cyber thieves nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime
  • Froud News
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.