Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला फरफटत नेलं, हाताचाही घेतला चावा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

हडपसर भागात पादचारी तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाने चोरट्यांना विरोध केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 23, 2024 | 05:31 PM
मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला फरफटत नेलं, हाताचाही घेतला चावा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला फरफटत नेलं, हाताचाही घेतला चावा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : हडपसर भागात पादचारी तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाने चोरट्यांना विरोध केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला फरफटत नेले, तसेच दुचाकीवरील दुसऱ्या चोरट्याने तरुणाच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर तरुणाचा मोबाइल चोरुन चोरटे पसार झाले. याबाबत २१ वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तरुण हडपसर भागातील भगीरथीनगर परिसरात राहायला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पादचारी तरुण भगीरथीनगर परिसरातून निघाला होता. तेव्हा सोसायटीकडे वळत असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. तरुणाने त्यांना विरोध केला, तसेच चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याने तरुणाला २०० ते ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. तर दुसऱ्याने तरुणाच्या हाताचा चावा घेतला. झटापटीत तरुणाच्या गुडघ्याला दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कुदळे अधिक तपास करत आहेत. शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात कार चालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दिली दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक

विवाह समारंभात महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरले

विवाह समारंभातून ज्येष्ठ महिलेचे दीड लाखांचे दागिने ठेवलेली पिशवी चोरुन नेल्याची घटना नगर रस्ता भागातील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारादार महिला चंदननगर भागात राहायला आहेत. त्यांच्या नात्यातील एकाचा विवाह गेल्या महिन्यात होत्या. फुलगाव येथील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ महिलेने दीड लाखांचे दागिने असलेली पिशवी मंगल कार्यालयातील खोलीत ठेवली होती. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने ठेवलेली पिशवी चोरुन नेली. विवाह समारंभ पार पडल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी तपास करत आहेत.

महिलांकडील मोबाइल लंपास

पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.

Web Title: It has come to light that thieves beat up a young man to steal a mobile phone nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 05:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
1

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
2

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
3

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
4

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.