Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात टोळक्याची दहशत, वाहनांची तोडफोड; कोयते उगारले अन्…

वानवडी परिसरातील भैरोबानाला येथे कोयतेधारी टोळक्याने भरदुपारी दहशत माजवत वाहनांची तोडफोड करून धुडगूस घातला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2024 | 03:04 PM
पुण्यात टोळक्याची दहशत, वाहनांची तोडफोड; कोयते उगारले अन्...

पुण्यात टोळक्याची दहशत, वाहनांची तोडफोड; कोयते उगारले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : वानवडी परिसरातील भैरोबानाला येथे कोयतेधारी टोळक्याने भरदुपारी दहशत माजवत वाहनांची तोडफोड करून धुडगूस घातला आहे. टोळक्याने कार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयुर उत्तम गायकवाड (वय ३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भैरोबानाला परिसरातील सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे. गुरुवारी भरदुपारी टोळके वस्तीत आले. त्यांच्याकडे कोयते आणि दांडके होते. त्यांनी कोयते आणि दांडके उगारुन दहशत माजवण्यास सुरूवात केली. नंतर पार्क केलेल्या कार, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची तोडफोड करुन टोळक्याने धुडगूस घातला. तसेच, रहिवाशांना शिवीगाळ देखील केली. तेव्हा मयूर गायकवाड हे घरातून बाहेर आले असता त्यांनाही या टोळक्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जिवे मारु’, अशी धमकी दिली. त्यानंतर टोळके तेथून निघून गेले. त्यांनी जाताना कालव्याजवळ लावलेली दुचाकी व रिक्षाचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत. पसार झालेल्या टोळक्याच्या शोध घेण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : ऐन निवडणूकीच्या धामधूमीत ३ बोकड अन् १ शेळी चोरीला; आजींची पोलीस ठाण्यात धाव

निवडणूका पार पडताच गुन्हेगारीला उत

गेल्या दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकांचा माहोल शहरात होता. परिणामी गुन्हेगारी कारवाया काही प्रमाणात कमी झाल्याचे जानवते. परंतु, आता मतदान होऊन दिवस होत नसतानाच पुन्हा शहरात गुन्हेगारांनी पुन्हा मुंडके वर काढले आहे. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यातील पहिली घटना वानवडी भागात वाहन तोडफोडीची घडल्याचे दिसत आहे. तर, मुंढव्यात खूनाचा प्रयत्न झाला आहे.

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: It has come to the fore that a gang has unleashed terror in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासह अनेक महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी
1

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासह अनेक महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी

‘ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक, आत्मसन्मानासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल’, एसटी कर्मचारी काँग्रेसचा बीड विभागाला इशारा
2

‘ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक, आत्मसन्मानासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल’, एसटी कर्मचारी काँग्रेसचा बीड विभागाला इशारा

Matheran Leopard News : माथेरानमध्ये बिबट्याची दहशत; हनिमून पॉईंटजवळ पाळीव कुत्र्याची शिकार, घटना CCTV मध्ये कैद
3

Matheran Leopard News : माथेरानमध्ये बिबट्याची दहशत; हनिमून पॉईंटजवळ पाळीव कुत्र्याची शिकार, घटना CCTV मध्ये कैद

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु
4

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.